ETV Bharat / state

'10 रुपयांत जेवणाची थाळी म्हणजे, शिवसेनेची मतांसाठी फसवाफसवी'

author img

By

Published : Oct 16, 2019, 3:55 PM IST

'सध्या विधानसभा प्रचारासाठी आमच्या वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. मात्र, कोल्हापूर-सांगलीला एवढा मोठा पूर आला होता. त्यावेळी एकदा पण यावसं वाटले नाही का? असा सवाल सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केला.

सुप्रिया सुळे यांची सभा

ठाणे- "हल्ली महागाईच्या काळात 10 रुपयात वडापाव येत नाही. मग 10 रुपयांत जेवणाची थाळी देणार म्हणजे शिवसेना मतांसाठी निव्वळ फसवाफसवी करीत आहे. माझ्या मतदारसंघात गेली चार ते पाच वर्षांपासून महिला बचत गटाच्या माध्यमातून 20 रुपयात जेवणाची थाळी दिली जाते. आम्ही निवडणूक पाहून निर्णय घेतला नव्हता, मात्र, निवडणूक पाहून शिवसेनेने केलेली ही घोषणा म्हणजे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे" अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे यांची सभा

हेही वाचा- मोदी हे आंतरराष्ट्रीय पंतप्रधान; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

'सध्या विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री येत आहेत. मात्र, कोल्हापूर-सांगलीला एवढा मोठा पूर आला होता. त्यावेळी एकदा पण यावसं वाटले नाही का? असा सवाल सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केला. गेल्या पाच वर्षांत या सरकासने कोणता चांगला बदल केला? महागाई कमी झाली का? लोकांना रोजगार मिळाले का?' असे विविध प्रश्न सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केले.

'कल्याण-डोंबिवलीतील रस्त्याच्या खड्ड्यांमुळे तिकडे यावेसे वाटत नाही,' असे सांगत त्यांनी इथल्या लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर ही टीकास्त्र सोडले, यावेळी सभेला हजारो महिलांनी सुप्रिया सुळे यांना ऐकण्यासाठी हजेरी लावली होती.

दरम्यान, कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे आमदार गणपत गायकवाड राष्ट्रवादीचे प्रकाश तरे आणि अपक्ष उमेदवार असलेले शिवसेनेचे बंडखोर धनंजय बोडारे या तीन उमेदवारांमध्ये काटे की टक्कर होणार आहे. मात्र, उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार हे 24 तारखेला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.

Intro:kit 319

Body:10 रुपयांत जेवणाची थाळी देणार म्हणजे, शिवसेनेची मतांसाठी फसवाफसवी ,,, सुप्रिया सुळे

ठाणे : हल्ली महागाईच्या काळात 10 रुपयात वडापाव येत नाही, मग 10 रुपयांत जेवणाची थाळी देणार म्हणजे शिवसेना मतांसाठी निव्वळ फसवाफसवी करीत असल्याचे टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी कल्याणात केली, सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की माझ्या मतदारसंघात गेली चार ते पाच वर्षांपासून महिला बचत गटाच्या माध्यमातून 20 रुपयात जेवणाची थाळी दिली जाते , आम्ही निवडणूक पाहून निर्णय घेतला नव्हता, मात्र निवडणूक पाहून शिवसेनेने केलेली ही घोषणा म्हणजे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचेही त्यांनी सांगत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की सध्या विधानसभा प्रचारासाठी आमच्या वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. मात्र कोल्हापूर-सांगली ला एवढा मोठा पूर आला होता. त्यावेळी एकदा पण यावसं वाटले नाही का? गेल्या पाच वर्षात या सारखा ने कोणता चांगला बदल केला? महागाई कमी झाली का? लोकांना रोजगार मिळाले का? असे विविध प्रश्न सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केले,
शेवटी कानी कल्याण-डोंबिवलीतील रस्त्याच्या दूरदर्शन आणि खड्ड्यांमुळे तिकडे यावेसे वाटत नाही असे सांगत त्यांनी इथल्या लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर ही टीकास्त्र सोडले, यावेळी सभेला हजारो महिलांनी सुप्रिया सुळे यांना ऐकण्यासाठी हजेरी लावली होती ,
दरम्यान कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे आमदार गणपत गायकवाड राष्ट्रवादीचे प्रकाश तरे आणि अपक्ष उमेदवार असलेले शिवसेनेचे बंडखोर धनंजय बोडारे या बिन उमेदवारांमध्ये काटे की टक्कर होणार असून ती हा उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार हे तर 24 तारखेला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल,

Conclusion:ncp
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.