ठाणे: मृतक मूळची पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका गावात कुटुंबासह राहत होती. तिचा विवाह झालेला होता. मात्र दोन वर्षांपासून पतीला सोडून ती भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावात असलेल्या जयमातादी कंपाऊंड भागातील एका इमारतीच्या प्रियकर विकास सोबत राहत होती. काही महिन्यापासून प्रियकर विकासला दारूचे व्यसन जडले. यामुळे दोघांमध्ये सतत भांडण होत असे.
विकास दररोज दारू पिउन तीला मारहाण करायचा तसेच तिचा सतत मानसिक व शारीरिक छळ (fed up with the persecution of her lover) करायचा. या छळाला कंटाळून अखेर तिने घरी कोणी नसताना किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली (Suicide of a married lover). प्रेयसीने आत्महत्या केल्याची घटना प्रियकराने तिच्या नातेवाईक व पोलिसांपासून लपवून ठेवली. अखेर २८ एप्रिल रोजी मृतकच्या ५० वर्षीय आईने नारपोली पोलीस ठाण्यात प्रियकर विकास विरोधात दिलेल्या तक्रारीवरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.