ETV Bharat / state

'शेतकऱ्यांच्या मुलांना सरसकट मोफत शिक्षणासह सुविधा द्या' - स्टूडंट्स इस्लामिक आर्गनायजेशन ऑफ इंडिया

या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या मुलांना सरसकट मोफत शिक्षणाची सोय करण्यासह विविध मागण्यांचे घोषणापत्र स्टूडंट्स इस्लामिक आर्गनायजेशन ऑफ इंडियाने जारी केले.

माहिती देताना पदाधिकारी
author img

By

Published : Apr 8, 2019, 9:19 PM IST

ठाणे - राजकीय पक्षाच्या वतीने मतदारांना आकर्षीत करण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतो. या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या मुलांना सरसकट मोफत शिक्षणाची सोय करण्यासह विविध मागण्यांचे घोषणापत्र स्टूडंट्स इस्लामिक आर्गनायजेशन ऑफ इंडियाने जारी केले. संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन घोषणापत्राचा समावेश जाहीरनाम्यात करण्याची मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली.

माहिती देताना पदाधिकारी

भिवंडीत पत्रकार परिषदेत स्टूडेंट्स इस्लामिक आर्गनायजेशन ऑफ इंडिया (एसआईओ) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेत मो. अली अध्यक्ष भिवंडी एसआयओ, खान अरफात, उमर मदु, हमजा शेख, अनस शेख, नईम लोहार, आदिल अंसारी, मोनिस अबरार, अकील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

स्टूडेंट्स इस्लामिक आर्गनायजेशन ऑफ इंडिया ही संघटना ३६ वर्षापासून देशभरातील सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देत आहे. संघटनेच्या वतीने विद्यार्थी व युवकांमध्ये रोजगार व शिक्षणाचा दर्जा उचंविण्यासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणापत्र जारी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. हे घोषणापत्र देशातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना देवून घोषणप पत्रातील मुद्दे आपआपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करावे अशी मागणी पदाधीकाऱ्यांनी केली आहे.

विशेष म्हणजे भाजप सरकारने ४ वर्षापूर्वी महाविद्यालय विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीची घोषणा केली होती. मात्र त्यावर आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. आपल्या देशात लोकतंत्र मजबूत व भविष्यात याच विद्यार्थांकडून निवडणुकीत मुख्य भूमिका निभवायची आहे. यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संघटनाच्या निवडणुकीचा प्रारंभ करावा, अशी मागणी या घोषणापत्रात करण्यात आली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:शेतकऱ्यांच्या मुलांना सरसकट शिक्षण मोफतसह विविध मागण्याचे स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियचे घोषणा पत्र जारी ,

सर, बातमी मेल केली आहे,
मोजो वर मराठी , हिंदी बाईट आणि व्हिजवल अपलोड

Conclusion:भिवंडी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.