ठाणे : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत पादचाऱ्यांकडून लुटलेले (Mobile Phone Seized) चार लाख १४ हजार रुपये किमतीचे ३७ मोबाईल (expensive mobile phone theft) मानपाडा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने हस्तगत केले (Stolen mobile phones seized) आहेत. विशेष म्हणजे हे मोबाईल महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, बिहार राज्यांमधून हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे (Thane Crime) यांनी दिली. (Latest news from Thane)
दर महिन्याला सात ते आठ मोबाईल चोरीच्या घटना : गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतून अनेक प्रवासी, पादचारी, व्यावसायिक यांचे महागडे मोबाईल चोरीला गेले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होऊन गुन्हे दाखल झाले होते. दर महिन्याला सात ते आठ घटना मोबाईल चोरीच्या होत असल्याने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी गुन्हे शोध पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे, सुनील तारमळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक गडगे, राजेंद्र खिल्लारे, विजय कोळी, यलप्पा पाटील, महादेव पवार, प्रवीण किनरे, महेंद्र मंझा यांचे तपास पथक तयार केले होते.
हस्तगत केलेले मोबाईल मालकांना परत : पोलिसांनी हस्तगत केलेले मोबाईल संबंधित मोबाईल मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून परत देण्यात आले. मोबाईल चोरणारे चोरटे मोबाईल चोरी नंतर पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी परराज्यात पळून जातात. तेथे ते कमी किमतीला चोरीचे मोबाईल विकतात. तेथून फरार होतात, असे पोलिसांनी सांगितले. एवढ्या मोठ्या संख्येने मोबाईल हस्तगत करण्याची कल्याण, डोंबिवलीतील ही पहिलीची महत्वाची घटना आहे. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.