ठाणे : शरद सुदाम निचिते असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर जावयाचे (case filed against son in law) नाव आहे. तर शशिकांत एकनाथ दुभेळे (वय 52) असे हल्ल्यात जखमी झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे सासरे हे शहापूर तालुक्यातील दहिगाव गावाचे पोलीस पाटील आहेत. त्यानंतर ९ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास आपल्या गरोदर मुलीला घेऊन सोनोग्राफी करण्यासाठी शहापूर शहरातील पंडित नाक्यावर असलेल्या आस्था सोनोग्राफी सेंटरमध्ये गेले (suspicion of wife abortion In Thane) होते. दुसरीकडे आरोपी जावयाला पत्नीचा गर्भपात करण्यासाठी नेल्याचा संशय आल्याने माथेफिरू जावई शरद निचिते हा थेट सोनोग्राफी सेंटरमध्ये पोहचला. (Nagpur Crime) त्यानंतर त्याने सासऱ्याशी वाद घालत माझ्या पत्नीला गर्भपात करण्यासाठी घेऊन आला का ? असा गैरसमज करून सासऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला (Son in law attacked with rod on father in law) केला. (Latest news from Nagpur)
सासऱ्याला जबर दुखापत : कोणीच भांडण सोडविण्यासाठी येत नसल्याचे पाहून जीव वाचविण्यासाठी सासऱ्याने डॉक्टरांच्या केबिनमध्ये धाव घेतली. मात्र या हल्ल्यात सासऱ्याला जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 324,504,506 अंतर्गत हल्लेखोर जावाया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.
जावयाची जीवे मारण्याची धमकी : शहापूर तालुक्यातील दहिगावचे पोलीस पाटील शशिकांत दुभेळे यांची मुलगी प्रज्ञा हिचा विवाह 26 एप्रिल 2020 रोजी शहापूर तालुक्यातील पाषाणे गावात राहणाऱ्या शरद निचिते याच्याशी झाला; मात्र पती शरद हा नेहमीच प्रज्ञाला मारहाण करत असे. तिला गरोदरपणीही मारहाण केल्याने तिचे जन्माला येणारे बाळ दगावले, असे सासरे शशिकांत यांना वाटत होते. त्यामुळे ७ जानेवारी रोजी सासरे हे आपल्या मुलीसह आरोपी जावयाला घेऊन शहापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. त्यातच आरोपी पतीने सासऱ्यावर गर्भपाताचा संशय घेत, जीवे ठार मारण्याची नातेवाइकांसमोर धमकी दिली. मात्र त्यावेळी नातेवाईकांनी दोघांमधील वाद सोडविला.