ठाणे - दहावीत शंभर पैकी शंभर पैकी गुण मिळवणे जेवढे अवघड त्यापेक्षाही सर्व विषयात 35 गुण मिळवणे म्हणजे दिव्यच. पण हेच दिव्य कल्याण पूर्वेतील सिद्धेश रेडिज या पठ्ठ्याने साध्य केले आहे.
सिद्धेशने मराठी असो वा इंग्लिश किंवा गणित असो वा विज्ञान सारख्या सर्व विषयात 35 गुण मिळवून परफेटक्ट 35 चा मान मिळवलाय. सध्या सिद्धेशच्या परफेटक्ट 35 ची सगळीकडेच चर्चा सुरु आहे.