ETV Bharat / state

Shraddha Murder Case : श्रद्धा खून प्रकरणातील आरोपीला चौकात फाशी देण्याची मागणी - Demand to hang the accused

श्रद्धा वाळकर खून प्रकरणातील ( Shraddha Murder Case ) आरोपीला चौकात फाशी देण्याची मनसेचे नेते महेश कदम यांनी केली आहे. श्रद्धा वाळकर ( Shraddha Walkar ) या तरुणीची हत्या करून तिचे तुकडे करणाऱ्या नराधमाला फाशी देण्याची ( Demand to hang the accused ) मागणी जोर धरत आहे.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case
author img

By

Published : Nov 17, 2022, 9:50 PM IST

ठाणे - दिल्लीत झालेल्या हत्याकांडची ( Shraddha Walkar murder case ) चर्चा सद्या देशभरात सुरु असून श्रद्धा वाळकर ( Shraddha Walkar ) या तरुणीची हत्या करून तिचे तुकडे करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी देण्याची ( Demand to hang the accused ) मागणी करण्यात येत आहे. ठाण्यातील चंदनवाडी परिसरात मनसेचे नेते महेश कदम यांनी बॅनर लावून निषेध दर्शवला, तसेच या नराधमाला प्रतीकात्मक फाशी देण्यात आली. या बॅनरमध्ये श्रद्धाच्या नराधमाला भर चौकात फाशी द्या अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे.

द्धा वाळकर खून प्रकरणातील आरोपीला चौकात फाशी देण्याची मागणी

वादातून हत्या केल्याची घटना - गेल्या ८ दिवसांपूर्वी प्रेम संबंधात असलेल्या अफताबने प्रेयसी श्रद्धा वाळकर हिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्या सोबत दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर एकमेकांमध्ये झालेल्या वादातून हत्या केल्याची घटना घडली. नराधम आरोपी अफताब हा इतक्यावर न थांबता त्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकल्याचे उघड झाले. या प्रकरणाच्या तपासात या घटनेला वळण येऊन लव्ह जिहादमधून हि हत्या केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र अशी विकृत ठेचण्याची गरज आहे. त्यामुळे या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सर्व क्षेत्रातून केली जात आहे. त्यातच आज ठाण्यामध्ये या घटनेचा निषेध दर्शवत बॅनर लावण्यात आला आहे. ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील मनसे नेते महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धाच्या नराधमाला भर चौकात फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक लावली फाशी - तसेच या बॅनरसमोर अफताब याच्या प्रतीकात्मक काल्पनिक प्रतिकृतीला भर चौकात फाशी देण्यात आली आहे. हि काल्पनिक प्रतिकृती सत्यात उतरण्यासाठी आम्ही हा बॅनर आणि काल्पनिक फाशी दाखवून निषेध केला असल्याचे महेश कदम यांनी सांगितले आहे. तसेच या फक्त आमच्या भावना नसून प्रत्येक तरुणीच्या आणि अशा प्रकारे प्रेम प्रकरणात फसलेल्या तरुणींच्या व्यथा आहेत. याला कुठे तरी ठेचल गेलं पाहिजे. अशा प्रकारे तरुणींची फसवणूक करून त्यांचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्या नराधमांना वचक बसण्यासाठी श्रद्धा हत्या प्रकरणाचा खटला हा फास्ट ट्रॅकवर सुरु करून भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी महेश कदम यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.