ETV Bharat / state

शिवसैनिक म्हणतात... खासदार उदयनराजे भोसलेंची कीव करावीशी वाटते - udayan raje bhosale news

भिवंडी तालुका वतीने पंचायत समिती कार्यालय परिसरात व्यंकय्या नायडू यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

खासदार उदयनराजे भोसलेंची कीव करावीशी वाटते

author img

By

Published : Jul 23, 2020, 7:32 PM IST

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्रासह देशातील जनतेच्या मनात आदराचे स्थान असून त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या व्यंकय्या नायडू यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. पण त्यांचा अवमान होत असताना छत्रपतींचे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी ते ऐकूण घेतले. याची कीव करावीशी वाटते अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे भिवंडी तालुका प्रमुख विश्वास थळे यांनी दिली आहे. यामुळे कोरोनाच्या महामारीतही राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी दिल्लीत पार पडला. राज्यसभा सदस्य म्हणून शपथविधी प्रसंगी उदयनराजे भोसले यांनी शपथ ग्रहणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राज्यसभा सदनांत घेऊ नये, हे माझे सदन आहे असे वक्तव्य उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी केल्याने तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. याचे पडसाद भिवंडीतही उमटले असून शिवसेना भिवंडी तालुका वतीने पंचायत समिती कार्यालय परिसरात व्यंकय्या नायडू यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख विश्वास थळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पंचायत समिती सभापती विकास भोईर, जिल्हा परिषद शिवसेना गटनेता कुंदन पाटील, जि.प.सदस्य गोकुळ नाईकयांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान, उपराष्ट्रपतींनी ट्विट करून यावर स्पष्टीकरण दिले आहे. 'मी शिवाजी महाराजांचा निस्सीम प्रशंसक आणि भवानी मातेचा भक्त आहे. मात्र, शपथविधी कार्यक्रमात कोणतीही घोषणा द्यायची नसते. या प्रथेची आठवण सदस्यांना करून दिली. यामध्ये शिवाजी महाराजांचा कोणताही अपमान केला नाही, अशी प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.