ETV Bharat / state

रिक्षाचालक ते गटनेते...असा आहे एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास! - eknath shinde latest news

शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाची माळ जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. यानंतर यामुळे एकनाथ शिंदे यांचे पक्षातील वजन वाढले असून येणाऱ्या काळात राज्यभरात सेनेच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये ते मोठी भूमिका बजावणार आहेत. जाणून घेऊया एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास...

शिवसेनेच्या गटनेतेपदाची माळ जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली.
author img

By

Published : Oct 31, 2019, 7:54 PM IST

ठाणे - शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाची माळ जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. यानंतर यामुळे एकनाथ शिंदे यांचे पक्षातील वजन वाढले असून येणाऱ्या काळात राज्यभरात सेनेच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये ते मोठी भूमिका बजावणार आहेत. रिक्षाचालक ते शिवसेना गटनेते असा एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे... जाणून घेऊया एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास...

  • #शिवसेना आमदारांच्या पार पडलेल्या बैठकीत #युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते व आमदार @AUThackeray जी यांनी शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी माझ्या नावाचा प्रस्ताव मांडला. याप्रसंगी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकमुखाने या प्रस्तावास समर्थन देत शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी माझी एकमताने निवड केली. pic.twitter.com/r02Fpf98Au

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आनंद दिघे यांच्या अपघाती मृत्यूनंतर जिल्ह्यात शिवसेना संपल्याचे चित्र असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख या नात्याने शिवसेना एकसंध ठेऊन मजबूत केली. यामुळे 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता आली.

तसेच शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, बदलापूर नगरपरिषद अशा सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळवण्यात हातभार लागला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन 1980च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवून उदरर्निवाह करत होते.

*

1984 साली किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती; सीमा आंदोलनात तुरुंगवास

*1997 मध्ये पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड

*2001 मध्ये सभागृहनेतेपदी निवड; सलग तीन वर्षे पद सांभाळले

*2004 मध्ये तत्कालीन ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार

*2005 साली शिवसेनेचे ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

*2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार

*2014 साली विधानसभेसाठी विजयाची हॅटट्रिक; विरोधी पक्षनेतेपदी निवड

*डिसेंबर 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ; एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला

*जानेवारी 2019 मध्ये आरोग्यमंत्रीपदाची माळ गळ्यात

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री

*पालकमंत्री या नात्याने ठाणे शहर व जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी

*धोकादायक अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना; या माध्यमातून लाखो नागरिकांना मालकी हक्काचे सुरक्षित घर मिळणार

*ठाणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर

*ठाणे व मुलुंडच्या दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या प्रकल्पाला मंजुरी

*जिल्ह्यासाठी स्वतंत्र काळू धरणाच्या रखडलेल्या प्रकल्पासमोरील अडचणी दूर केल्या

*बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाअभावी रखडले होते; या अडचणी दूर केल्यामुळे यंदा पूर्ण क्षमतेने धरण भरले

*संपूर्ण एमएमआरसाठी क्लस्टर योजना लागू करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Intro:Body:

श्री. एकनाथ शिंदे (संक्षिप्त माहिती)

वैयक्तिक माहिती

संपूर्ण नाव : एकनाथ संभाजी शिंदे; जन्म : ९ फेब्रुवारी १९६४

पत्नी : सौ. लता एकनाथ शिंदे

मुलगा : खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

स्नुषा : सौ. वृषाली श्रीकांत शिंदे

·         शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन १९८०च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारणाला सुरुवात

·         १९८४ साली किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती.. शिवसैनिक या नात्याने अनेक आंदोलनांमध्ये सहभाग. सीमा आंदोलनात तुरुंगवासही भोगला

·         १९९७ साली पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले

·         सन २००१ मध्ये सभागृहनेतेपदी निवड... सलग तीन वर्षे पद सांभाळले

·         सन २००४ मध्ये त्यावेळच्या ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी

·         सन २००५ मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती.

·         सन २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार

·         सन २०१४ साली विजयाची हॅटट्रिक.. विरोधी पक्षनेतेपदी निवड

·         डिसेंबर २०१४ मध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ. एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला

·         जानेवारी २०१९ मध्ये आरोग्यमंत्रीपदी निवड

मंत्रीपदावरील कामगिरी

·         मरणपंथाला लागलेल्या एमएसआरडीसीला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याची करामत

·         आज एमएसआरडीसीच्या माध्यमातून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, वाशी येथील तिसरा खाडी पुल, मुंबई-पुणे दृतगती महामार्गाचा क्षमता विस्तार (खालापूर ते लोणावळा टनेल मार्ग), शीळ-कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण, विदर्भातील रेल्वेवरील २७ उड्डाणपुल अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर

·         मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना

·         रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी मेटलबीम क्रॅश बॅरिअर आणि वायर रोप बॅरिअल लावले

·         संपूर्ण महामार्गावर थर्मोप्लास्टिक पेंट आणि आवश्यक तिथे रंबलर

·         दोन हजारांहून अधिक ठळकपणे दिसणारे सूचना फलक

·         डेल्टा फोर्सच्या माध्यमातून गस्त वाढवली

·         स्पीड लिमिटचं पालन व्हावं, यासाठी सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या माध्यमातून उपाययोजना

·         परिणामी अपघात कमी झाले.. २०१६ मध्ये अपघातांमध्ये १५१ बळी.. २०१८ मध्ये संख्या कमी होऊन ११०

·         हे प्रमाण शून्यावर यावं यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने झिरो फटॅलिटी कॉरिडॉर योजनेची अमलबजावणी

·         नुकतंच ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटरचं उद्घाटन झालं... अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणार

·         दरडी कोसळू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या.. अजूनही कामं सुरू आहेत

आरोग्यमंत्री या नात्याने अवघ्या सहा महिन्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले..

·         आशा सेविकांची पगारवाढ

·         कंत्राटी पद्धतीने दुर्गम भागात काम करणाऱ्या ७३८ बीएएमएस डॉक्टरांना सेवेत कायम

·         एमबीबीएस डॉक्टर्स आणि विशेषज्ञांची ८९० पदं भरली

·         राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत सेवा देणाऱ्या सुमारे ३४ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता प्रत्येकाला किमान १५ हजार ६०० रुपये वेतन

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री

·         पालकमंत्री या नात्याने ठाणे शहर व जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी

·         धोकादायक अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना.. या माध्यमातून लाखो नागरिकांना मालकी हक्काचे सुरक्षित घर मिळणार

·         ठाणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर

·         ठाणे व मुलुंडच्या दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या प्रकल्पाला मंजुरी

·         ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र काळू धरणाच्या रखडलेल्या प्रकल्पासमोरील अडचणी दूर केल्या

·         बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाअभावी रखडले होते, या अडचणी दूर केल्यामुळे यंदा पूर्ण क्षमतेने धरण भरले

·         संपूर्ण एमएमआरसाठी क्लस्टर योजना लागू करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

आनंद दिघे यांच्या अपघाती मृत्यूनंतर ठाण्यात शिवसेना संपली, असे चित्र असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख या नात्याने ठाण्यात शिवसेना केवळ एकसंध ठेवली असे नाही, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत केली... त्यामुळे दोन वर्षांपूर्वी प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला. २०१७ साली झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता.. याखेरीज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, बदलापूर नगरपरिषद अशा सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळाली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.