ठाणे - लोकसभा मतदारसंघात निर्विवाद बहुमत युतीचे उमेदवार राजन विचारे हे विक्रमी मताधिक्यानी निवडून आले आहेत. गुरुवारी झालेल्या मतदान मोजणीत राजन विचारे यांना एकूण ७ लाख ४० हजार ९६९ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना ३ लाख २८ हजार ८२४ मते मिळाली. ठाण्यातील सहा मतदारसंघात शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मतदान विधानसभा परिसरातून मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात युतीला मोठे यश मिळाले आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात १४५ मीरा भायंदर, १४६ ओवळा माजिवडा, १४७ कोपरी पाचपाखाडी, १४८ ठाणे, १५० एरोली, १५१ बेलापूर या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात विधानसभा स्तरावर आघाडीचे उमेदवार आणि युतीचे उमेदवार यांना मिळालेल्या मतदानामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार राजन विचारे यांना आघाडी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना ईव्हीएम मशीनमधून एकूण ३ लाख २८ हजार ८८ मतदान मिळाले, तर पोस्टाद्वारे टाकण्यात आलेल्या मतदानाचा आकडा हा ७३६ इतका आहे, तर युतीचे उमेदवार राजन विचारे यांना ईव्हीएम मशीनद्वारे मिळालेले मतदान ७ लाख ३८ हजार ६१८ इतके असून पोस्टाद्वारे मिळालेले मतदानाची संख्या २ हजार ३५१ इतकी आहे.
आनंद परांजपे राजन विचारे
मीरा-भायदर - ६४,७२० १,३३,९८८
ओवळा-माजिवडा - ४७,९९३ १,४०,७११
कोपरी - ४०,९६७ १.२२,३१६
ठाणे - ४७,६५५ १.३०,७६३
ऐरोली - ६३,३१३ १,०७,६७६
बेलापूर - ६३,४४० १,०३,१६४
पोस्टल मतदान - ७३६ २,३५१
एकूण मतदान ३,२८,८२४ ७,४०,९६९