ठाणे : आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेची झालेली दुफळी मनसेच्या फायद्याची (Shiv Sena Thackeray and Shinde factions dispute) आहे, असे चित्र पाहायला मिळत आहे. सध्याचे राजकारण हे गटातटाच्या चुरशीचे राजकारण आहे. या फोडाफोडीच्या राजकारणात भाजप करता-करविता असला तरीही महत्वाची राजकीय फायदा घेण्याच्या तयारीत मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Shiv Sena dispute benefit to MNS Raj Thackeray)आहे. अनेक नेते राज ठाकरेंच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी राज ठाकरे निर्णय घेतील, या वक्तव्याने आता पुन्हा दोन्ही गट झालेली शिवसेना फुटणार कि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेनेची मशाल : शिवसेनेतून ४० आमदार फुटले, मात्र शिवसेनेची मशाल ही तेवतच होती. बलाढ्य आणि देशावर सत्ता गाजविणारी भाजप उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के दिल्यानंतरही अस्वस्थ करू शकले नाही. पण आता पालिका निवडणुका लक्षात घेऊन मैदानात मनसे पूर्ण तयारीनिशी उतरत असल्याने निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला फटका बसण्याची चिन्हे आहेत. पालिका निवडणूक तोंडावर आलेल्या आहेत. शिवसेना विरुद्ध भाजप असा लढा असतानाही आता शिवसेनेचे शिंदे गट हे मैदानात उतरलेले आहेत. तरीही उद्धव ठाकरे निश्चिन्त होते. मात्र आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सुरत सूर मिसळत मनसे पुढे पुढे येत चालल्याने आणि त्यांच्या मागे भाजप अदृश्य असल्याने निवडणुकीत मतदारांमध्ये गोंधळ उडणार (Shiv Sena Thackeray and Shinde factions) आहे.
हिंदुत्व आणि मराठी माणूस : थोडक्यात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) या पक्षाची ध्येय -हिंदुत्व आणि मराठी माणूस हा महत्वाचा आहे. त्यात आता बाळासाहेबांची शिवसेना (Eknath Shinde) ही देखील बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व घेऊन वाटचाल करीत आहे. तर मनसे हा हिंदुत्व आणि मराठी माणूस या बेसवर वाटचाल करीत आहे. निवडणुकीत कदाचित दोघांची भांडणे आणि तिसऱ्याच लाभ म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या लढतीत मात्र फायदा मनसेलाच होणार आहे.
अनेक नेते राज ठाकरेंच्या संपर्कात : शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मोठे नेते हे आता राज ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे मनसे पदाधिकारी सांगत असून त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळणार आहे. मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या दाव्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे अन्य आमदारही मनसे प्रमुखांच्या संपर्कात आहेत. हे जर खरे असले तर मात्र मनसे यामध्ये बाजी मारून जाण्याची शक्यता नाकारता येत (Shiv Sena dispute benefit to MNS) नाही.
हिंदू नेते म्हणून राज ठाकरेंना पसंती : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना संपूर्ण देशभरातून हिंदू नेता म्हणून पाठिंबा मिळत आहे. राज ठाकरे हीच अनेकांची पसंती असल्याचे माणसाचे नेते सांगत आहेत. आगामी निवडणुकीत या प्रतिमेचा फायदा निवडणुकीत मतदानामध्ये दिसून येणार आहे, असा विश्वास देखील सांगत आहेत.