ETV Bharat / state

मनसे आमदारांची 'आयत्या बिळावर नागोबा'ची सवय जुनीच; शिवसेना आमदारांची टीका

कल्याणच्या वडवली पुलाचे मनसेने लोकार्पण केल्यानंतर शिवसेना-मनसेत पुलाच्या लोकार्पणावरून राजकीय वातावरण तापले आहे. आयत्या बिळावर नागोबा होण्याची मनसेचे आमदार राजू पाटील यांची जुनीच सवय असल्याची टीका कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Mar 23, 2021, 6:55 PM IST

ठाणे - 'आयत्या बिळावर नागोबा' होण्याची मनसेचे आमदार राजू पाटील यांची जुनीच सवय असल्याची टीका कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. कल्याणच्या वडवली पुलाचे मनसेने लोकार्पण केल्यानंतर शिवसेना-मनसेत पुलाच्या लोकार्पणावरून राजकीय वातावरण तापले आहे.

ठाणे

शिवसेना नेत्यांच्या हस्ते पुलाचे होणार होते लोकार्पण...

कल्याण-कसारा मार्गावरील वडवली रेल्वे द्वारावरून वडवली-आंबिवलीला जोडणाऱ्या रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून सोमवारी त्याचे लोकार्पण शिवसेना नेत्यांच्या हस्ते केले जाणार होते. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. नेमकी हीच संधी साधत मनसेने सोमवारी संध्याकाळी गनिमी काव्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. यावरून शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी मनसेवर निशाणा साधत शिवसेनेच्या कामाचे श्रेय घ्यायचे, ही मनसे आमदार राजू पाटील यांची जुनी सवय असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच केवळ लोकांचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने केलेला हा देखावा असल्याचेही आमदार भोईर यावेळी म्हणाले.

मनसे एवढे दिवस काय झोपा काढत होती का?

हा उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी भूसंपादनाची अडचण होती. यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर मनसे एवढे दिवस काय झोपा काढत होती का? १२ वर्षे कोणतेही आंदोलन नाही की पत्रव्यवहार नाही. शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय घ्यायचे ही त्यांची जुनीच खोड असल्याचे सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांनी मनसेवर हल्ला चढवला. विशेष म्हणजे मनसेच्या लोकार्पणानंतर स्थानिक पोलिसांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. यामुळे पत्रीपुलानंतर आता वडवली पुलावरून मनसे-शिवसेनेत राजकारण तापले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.