ETV Bharat / state

Vande Bharat Train Thane : वंदे भारत एक्स्प्रेसला आसनगांव, कसाऱ्यात थांबा देण्याची शिंदे गटाची रेल्वे प्रशासनाकडे मागणी - वंदे भारत एक्स्प्रेसला कसारा थांबा

येत्या १० फेब्रुवारीपासून मुंबई ते (साईनगर) शिर्डी अशी धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगांव आणि कसारा स्थानकात थांबा देण्याची मागणी शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख भरत उबाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Feb 3, 2023, 7:36 PM IST

ठाणे - मुंबई ते शिर्डी हे अंतर कापण्यासाठी या एक्स्प्रेसला ६ तास लागतील. तर १६ डबे राहणार असून १ हजार १२८ प्रवासी क्षमता आहे. गुरुवार वगळता आठवड्यातील ६ दिवस ही एक्स्प्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून यावेळी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाहून शिर्डीसाठी ही एक्स्प्रेस सकाळी सव्वासहा वाजता निघून दुपारी सव्वाबारा वाजता पोहचेल.

मुंबई ते शिर्डी दरम्यान या स्थनाकात थांबणार - दादर, ठाणे, कल्याण, इगतपूरी, नाशिकरोड, मनमाड येथे थांबे देण्यात आले आहेत. परंतु शहापूर तालुक्यातील आसनगांव व कसारा येथे थांबे दिल्यास ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, पडघा तसेच पालघर जिल्ह्यातील वसई, वाडा, मोखाडा आणि इतर भागातील भाविकांना या एक्सप्रेसच्या सेवेचा लाभ घेता येईल, असे भरत उबाळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, ही एक्स्प्रेस शिर्डी येथून सायंकाळी सव्वापाच वाजता परतीचा प्रवास सुरु करेल ती रात्री सव्वाअकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचेल.

दर्शन घेऊन पुन्हा मुंबईला येणे शक्य- भारताची सर्वात अत्याधुनिक आणि पूर्णतः भारतीय बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस पहिल्यांदाच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुबंई दौऱ्यावर पुन्हा येत असून यांच्या हस्ते १० फेब्रुवारीला वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या दोन वंदे भारत एक्सप्रेसमुळं एका दिवसात शिर्डी आणि पंढरपूर अशा दोन्ही तीर्थस्थळावर एकाच दिवशी जाऊन दर्शन घेऊन पुन्हा मुंबईला येणे शक्य होणार आहे.

अस असले वेळापत्रक - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (साईनगर) शिर्डीसाठी सकाळी ६ वाजून १५ वाजता वंदे भारत एक्स्प्रेस सुटणार आहे. तिथे ही वंदे भारत एक्स्प्रेस १२ वाजून १० ला पोहोचेल. पुन्हा परतीच्या प्रवाशाला त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटाला सुटून मुंबईला रात्री ११ वाजून १८ मिनिटाला पोहोचणार असल्याची मध्य रेल्वे प्रशासनाकडून अशी माहिती जारी करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.