ETV Bharat / state

लॉकडाऊनचे उल्लंघन : शेकडो गाड्या पोलीस ठाण्यात जमा, वर्तकनगर पोलिसांची कारवाई - कोरोना विषाणू

भाजीपाला खरेदीसाठी लोकांनी बाहेर पडायच्या निमित्ताने शहरभर विनाकारण फिरायला सुरुवात केली. अनेकजण विनाकारण फिरत असतातच, परंतु अनेक महाभाग आपल्या बायकामुलांना देखील गाडीवरून फिरवताना दिसत असल्याने अखेर पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागला.

lockdown
लॉकडाऊनचे उल्लंघन
author img

By

Published : May 1, 2020, 12:53 PM IST

ठाणे - कोणी काही म्हणो, आम्ही काही ऐकणार नाही, असेच जणू नागरिकांनी ठरवल्यावर मग प्रशासनाला कडक पाऊले उचलल्याशिवाय कोणता पर्यायच उरत नाही. असेच चित्र सध्या ठाणे शहरात दिसत लोकांना वारंवार सांगूनही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे वर्तकनगर पोलिसांनी कारवाई करत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची वाहने जप्त केली आहेत.

कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असल्याने सरकारने लॉकडाऊन जाहीर करत नागरिकांना घरीच बसून संसर्गाची साखळी तोडण्याचे आवाहन केले. परंतु, सरकारी आदेशांना हरताळ कसा फासायचा हे आपल्या नागरिकांना सांगायलाच नको. भाजीपाला खरेदीसाठी लोकांनी बाहेर पडायच्या निमित्ताने शहरभर विनाकारण फिरायला सुरुवात केली. अनेकजण विनाकारण फिरत असतातच, परंतु अनेक महाभाग आपल्या बायकामुलांना देखील गाडीवरून फिरवताना दिसत असल्याने अखेर पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागला.

वर्तक पोलिसांनी शेकडो नागरिकांना पकडून त्यांच्या गाड्या जप्त केल्या आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सोडून विनाकारण 2 व्हीलर व 4 व्हिलर घेऊन फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कलम 188 व इतर अधिनियमाप्रमाणे एकूण 6 हजार 282 वाहने जप्त करून 39 लाख 56 हजार 950 रूपये दंड आकारण्यात आला आहे. लॉकडाऊननंतर सदर गाड्या त्यांच्या मालकांच्या स्वाधीन करण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.