ETV Bharat / state

भिवंडीहून गोरखपूरला जाणारी श्रमिक ट्रेनची बुकिंग काही वेळातच फूल - thane

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे यंत्रमाग कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता १४ दिवसांचा लॉकडाऊन वाढल्यानंतर भिवंडीतील परप्रांतीय कामगारांसाठी भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते गोरखपूर अशा विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.

bhiwandi gorakhpur shramik train
भिवंडीहून गोरखपूरला जाणारी श्रमिक ट्रेनची बुकिंग काही वेळातच फूल
author img

By

Published : May 2, 2020, 8:52 PM IST

ठाणे- तिसऱ्यांदा १४ दिवसांचा लॉकडाऊन वाढविल्यानंतर भिवंडीतील परप्रांतीय कामगारांसाठी भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते गोरखपूर अशा विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे कामगारांनी एकच गर्दी केल्याने गोरखपूरला जाणाऱ्या श्रमिक ट्रेनचे बुकिंग काही वेळातच फुल झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊनची तिसऱ्यांदा घोषणा करण्यात आली. यामुळे यंत्रमाग कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता १४ दिवसाचा लॉकडाऊन वाढल्यानंतर भिवंडीतील परप्रांतीय कामगारांसाठी भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते गोरखपूर अशा विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी पोलिसांनी नागरिकांच्या थांबण्यासाठी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून चोख व्यवस्था केली होती. भोईवाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मजुरांसाठी टावरे स्टेडियम, भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मजूरांसाठी मानसरोवर, निजामपुरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मजूरांसाठी एसटी स्टँड, तर शांतीनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मजुरांसाठी भादवड येथील संपदा नाईक हॉल येथे व्यवस्था करण्यात आली होती.

तसेच, नारपोली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मजुरांना अंजूरफाटा येथील हरी धारा इमारत आणि कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील मजुरांना कोनगाव पंचक्रोशी मैदान कोनगाव येथे बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, मजुरांनी सर्वच ठिकाणी एकच गर्दी केल्याने १ हजार २०० सीटची ही विशेष श्रमिक ट्रेन अवघ्या काही वेळातच फूल झाली आहे. ही ट्रेन आज भिवंडी रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुटणार होती, मात्र प्रवाशांची वैद्यकीय चाचणी व ओळखपत्र वगैरे पेपर तपासणीत उशीर होणार असल्याने ही ट्रेन सुटण्यास रात्री उशिरा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, आता ट्रेनची बुकिंग फूल झाली असून नागरिकांनी शहरात गर्दी करू नये अन्यथा संचारबंदी कायद्यानुसार कारवाई करावी लागेल, असे आवाहन भिवंडी पोलीस प्रशासनाने शहर वासियांसह परप्रांतीय मजुरांना केले आहे.

हेही वाचा- 'पनवेल 4 मेपासून बंदचा तो व्हायरल मेसेज खोटा, असा कोणाताही निर्णय नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.