ETV Bharat / state

वनविभागाने स्थानबद्ध केलेले पोकलेन मशीन मालकाने पळवले; गुन्हा दाखल - machine

वनविभागाच्या पथकाने खोदकाम करणारा पोकलेन जप्त करण्याची परिस्थिती नसल्याने जागेवरच थेट पोकलेन स्थानबद्ध करण्यात आला.

वनविभागाने स्थानबद्ध केलेले पोकलेन मशीन मालकाने पळवले; गुन्हा दाखल
author img

By

Published : May 25, 2019, 11:43 PM IST

ठाणे - रेती उपसा प्रतिबंध असताना चुआ ब्रिजच्याकडेला पोकलेनद्वारे खोदकाम करत मातीचा उपसा करून कांदळवनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या प्रकरणी वनविभागाच्या वनपाल यांनी पोकलेन स्थानबद्ध केला. मात्र, कारवाईनंतर स्थानबद्ध केलेला पोकलेन मालकाने घेऊन पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळवा वनपाल प्रभाकर बाळकृष्ण कुडाळकर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात पोकलेन मालक मौसीन उर्फ नन्नेप्रदान याच्याविरोधात भारतीय दंड विधान ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक केली.

वनविभागाने स्थानबद्ध केलेले पोकलेन मशीन मालकाने पळवले; गुन्हा दाखल

फिर्यादी प्रभाकर बाळकृष्ण कुडाळकर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, उपवन संरक्षक विभागाला २३ मे ला ७.३० च्या सुमारास मोबाईलवर तक्रार आली. याठिकाणी वनपाल ए. एस. निचिते(शहाबाज), वनपाल वन्यजीव ठाणे एम आर परदेशी, वनरक्षक महापे सचिन सुर्वे, कार्यालयीन वनरक्षक ठाणे प्रवीण खांडेराव आव्हाड, वनरक्षक मुंब्रा आर के सोळखी, वनरक्षक कळवा ए सी उंद्रीकर पोहचले. या तक्रारी नुसार मौजे मुंब्रा चुहाब्रिजच्या पुढे रोडच्या उजव्या बाजूला खाडीच्या किनाऱ्यावर पोकलेन मशीनद्वारे खोदकाम करुन कांदळवनाचा नाश होत असल्याचे आढळले.

त्याचवेळी वनविभागाच्या पथकाने खोदकाम करणारा पोकलेन जप्त करण्याची परिस्थिती नसल्याने जागेवरच थेट पोकलेन स्थानबद्ध करण्यात आला. चौकशी नंतर पोकलेन चालवणारा गुलाब दयाराम पाल(३४.वय रा. मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा पोकलेन मशीन मौसीन उर्फ नन्नेप्रदान यांच्या मालकीचे असून ते पाल यांना चालवण्यास दिले असल्याचे त्यांने सांगितले. २४ मे ला पुन्हा घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी पोहचले असता पोकलेन वनविभागाचा परवाना न घेता पळवून नेले असल्याचे लक्षात आले. त्यानंतर २४ मे रोजी रात्री ९-३० च्या सुमारास मुंब्रा पोलीस ठाण्यात पोकलेन मालक मौसीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंब्रा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:Body:

खोदकाम करून कांदळवनाचे नुकसान
करणाऱ्याचे पोकलेन मशिनसह पलायन
मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंब्रा पोलिसांनी केली आरोपीला अटक

रेतीउपासा प्रतिबंध असताना चुआ ब्रिजच्या कडेला पोकलेनद्वारे खोदकाम करीत मातीचा उपसा करून रेतीउपसासह कांदळवनाचे मोत्ज्या प्रमाणत नुकसान केले. या प्रकरणी वनविभागाच्या वनपाल यांनी पोकलेन स्थानबद्ध केला. मात्र सदर कारवाईनंतर स्थानबद्ध केलेला पोकलेन मालक घेऊन पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कळवा वनपाल प्रभाकर बाळकृष्ण कुडाळकर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात पोकलेन मालक मौसीन उर्फ नन्नेप्रदान याच्या विरोधात भादवी ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच त्वरित आरोपीला शनिवारी अटक केली.

फिर्यादी प्रभाकर बाळकृष्ण कुडाळकर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार उपवन संरक्षक विभागाकडे आलेल्या तक्रारीच्या अनुशंघाने २३ मी रोजी ७-३० वाजण्याच्या सुमारास मोबाईलवर मौजे मुंब्रा चुहाब्रीजच्या पुढे दिव्याला जाणाऱ्या रोडच्या उजव्या बाजूला खाडी किनारी पोकलेन मशीनद्वारे खोदकाम करून कांदळवनाचा नाश करीत असल्याच्या ठिकाणी वनपाल ए. एस. निचिते(शहाबाज), वनपाल वन्यजीव ठाणे एम आर परदेशी, वनरक्षक महापे सचिन सुर्वे, कार्यालयीन वनरक्षक ठाणे प्रवीण खांडेराव आव्हाड, वनरक्षक मुंब्रा आर के सोळखी, वनरक्षक कळवा ए सी उंद्रीकर या टीमसह चुहाब्रीजच्या बाजूला पोकलेनद्वारे रेतीउपासा करीत मातीचा ढिगारा उपसलेले आढळले. त्याचवेळी वनविभागाच्या पथकाने खोदकाम करणारे पोकलेन जप्ती करण्याची परिस्थिती नसल्याने जागेवरच थेट पोकलेन स्थानबद्ध करण्यात आले. चौकशी अंती लक्षात आले. सदर पोकलेन चालविणारा गुलाब दयाराम पाल(३४) रा. मध्यप्रदेश याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा पोकलेन मशीन मौसीन उर्फ नन्नेप्रदान यांच्या मालकीचे असून ते पाल यांना चाल्विनाय्स दिले. २४ मे रोजी पुन्हा घटनास्थळी पोहचल्यानंतर पोकलेन हा वनविभागाच्या विनापरवाना पळवून नेले. त्यानंतर २४ मे रोजी रात्री ९-३० वाजण्याच्या सुमारास मुंब्रा पोलीस ठाण्यात पोकलेन मालक मौसीन उर्फ नन्नेप्रदान याच्या विरोधात गुन्हा दाखल करणायत आला. मुंब्रा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.