ठाणे : वाढत्या दुधाच्या भाववाढी विरोधात आणि भाव वाढीप्रमाणे १० टक्के कमिशन मिळावं या मागणीसाठी, ठाण्यातील दूध विक्रेत्यांनी आंदोलन करण्याचा (sale of milk will be closed agitation will be held for increase in commission) इशारा दिला आहे. ऐन सणासुदीच्या काळात येत्या २१ तारखेला एक दिवशीय लाक्षणिक दूध विक्री बंद पुकारला जाणार आहे. ठाणे शहरात सुमारे ७०० दूध विक्रेते आहेत. Milk sellers agitation
गेल्या ४ वर्षांत दूध उत्पादन कंपनी कडून दुधाचे भाव १८ रुपयांनी वाढले गेले. परंतु दूध विक्रेत्यांना त्यातून १८ पैसे देखील कमिशन दिले जात नाही. वारंवार याबाबत मागणी करून देखील कोणतीही दाद या दूध विक्रेत्यांना मिळत नाही. त्यामुळे येत्या २१ तारखेला 'ठाणे शहर दूध व्यवसायिक कल्याणकारी संस्थेच्या' वतीने एक दिवशीय दूध विक्री बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, ठाणे शहर दूध व्यावसायिक दूध विक्रेते कल्याणकारी संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोंडकर यांनी दिली आहे.
अविरत सेवा सुरूच : दूध वितरण करणारी ही सगळी मंडळी मागील अनेक दशकांपासून या व्यवसायामध्ये आहे. दुधाच्या किमती 20 रुपयांनी वाढल्या मात्र, त्यांचे कमिशन दहा पैशाने देखील वाढलेले नाही. अनेकदा यासाठी आंदोलन करून देखील सरकारकडून आणि दूध वितरकांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने, हे आंदोलनाचें हत्यार उपसल्याचे पदाधिकारी सांगत आहेत.Milk sellers agitation