ETV Bharat / state

जनावरांची चोरटी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला संतप्त जमावाने दिले पेटवून - टेम्पोला संतप्त जमावाने दिले पेटवून

दहिगाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या मोकळ्या फिरणाऱ्या जनावरांना बेशुद्धीचे इंजेक्शन मारून जनावरे चोरणारी टोळी सक्रिय होती. या परिसरात अनेक जनावरे चोरी गेल्याची नोंद खर्डी पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी नोंदवली आहे.

चोरटी वाहतूक
author img

By

Published : Jul 3, 2019, 6:15 PM IST

ठाणे - शहापूर तालुक्यातील खडी - वैतरणा रस्त्यावर बागेचा पाडा येथे जनावरांची चोरटी वाहतूक करणारा टेम्पो गावकऱ्यांनी पकडला. यानंतर जमावाने टेम्पोमधील जनावरे उतरवून टेम्पोच पेटवून दिला. यातील चालकासह साथीदाराला पकडून जमावाने बेदम चोप देऊन खर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

जनावरांची चोरटी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला संतप्त जमावाने दिले पेटवून

मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या मोकळ्या फिरणाऱ्या जनावरांना बेशुद्धीचे इंजेक्शन मारून जनावरे चोरणारी टोळी सक्रिय होती. या परिसरात अनेक जनावरे चोरी गेल्याची नोंद खर्डी पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी नोंदवली आहे. अशाच प्रकारे मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका टेम्पोमध्ये निर्दयीपणे बांधून जनावरे भरून खर्डीकडे जात असताना बागेचा पाडा येथील वन विभागाच्या गेटवर ग्रामस्थांना जाताना दिसला. यावेळी ग्रामस्थांनी जमून सदर टेम्पो अडवला असता, त्यामध्ये चोरीची जनावरे असल्याचे निदर्शनास आले. यामुळे गावकरी संतप्त होऊन टेम्पो चालकासह त्याच्या साथीदाराला चोप देत खर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर टेम्पोमधील पाच जनावरे बाहेर काढून संतप्त जमावाने टेम्पो आगीच्या हवाली केला.

दरम्यान, संतप्त जमावाला खर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे यांनी शांत केले. त्या दोन जनावरे चोरट्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:जनावरांची चोरटी वाहतूक करणाऱ्या टेम्पल संतप्त जमावाने केले आगीच्या हवाली

ठाणे : शहापूर तालुक्यातील खडी - वैतरणा रस्त्यावर बागेचा पाडा येथे जनावरांची चोरटी वाहतूक करणाऱ्या टेम्पो गावकऱ्यांनी पकडल्याची घटना घडली आहे,

खळबळजनक बाब म्हणजे गावकऱ्यांचा जमाव एवढ्यावर थांबला नाही, तर त्यांनी टेम्पो मधील जनावरे उतरून टेंपो आगीच्या हवाली केला, तर टेंपो चालकासह साथीदाराला पकडून जमावाने बेदम चोप देऊन खर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले,

मिळालेल्या माहितीनुसार दहिगाव व परिसरातून शेतकऱ्यांची मोकळे जनावरे (गाई, बैल) यांना बेशुद्धीचे इंजेक्शन मारून जनावरे चोरणारी टोळी सक्रिय असून या परिसरात अनेक जनावरे चोरी गेल्याची नोंद खर्डी पोलीस ठाण्यात शेतकऱ्याने नोंदवली आहे, अशाच प्रकारे काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका टेम्पोमध्ये निर्दयपणे बांधून जनावरे भरून खर्डी कडे जात असताना बागेचा पाडा येथील वन विभागाच्या गेटवर ग्रामस्थांना जाताना दिसला, यावेळी ग्रामस्थांनी जमुन सदर टेम्पो अडविला असता, त्यामध्ये चोरीचे जनावरे असल्याचे निदर्शनास आले, यामुळे गावकरी संतप्त होऊन टेम्पो चालकासह त्याच्या साथीदाराला बेदम मारहाण करीत खर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले , तर टेम्पोमधील पाच जनावरे बाहेर काढून संतप्त जमावाने टेम्पो आगीच्या हवाली केला,

दरम्यान संतप्त जमावाला खर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे यांनी शांत करून या दोघा जनावर चोरट्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे,

ftp foldar - tha, shahapur 3.7.19

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.