ETV Bharat / state

Robbers Arrested : कंटेनरमधून लाखोंचा किराणा लुटणाऱ्या दरोडेखारांना २४ तासांत बेड्या, कोनगाव पोलीसांची कारवाई

मुंबई - नाशिक महामार्गवर उड्डाणपुलाखाली उभा असलेल्या कंटेनरमधून टी मार्टचा किराणा लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या (Robbers Arrested) टोळीचा कोनगाव पोलिसांच्या पथकाने २४ तासातच शोध घेऊन त्यांना मुद्देमालासह बेड्या (Robbers who theft lakhs of groceries) ठोकल्या.

Robbers Arrested
कंटेनरमधून लाखोंचा किराणा लुटणाऱ्या दरोडेखारांना २४ तासांत बेड्या, कोनगाव पोलीसांची कारवाई
author img

By

Published : Nov 26, 2022, 10:32 PM IST

ठाणे : मुंबई - नाशिक महामार्गवर उड्डाणपुलाखाली उभा असलेल्या कंटेनरमधून डी. मार्टचा किराणा लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा कोनगाव पोलिसांच्या पथकाने २४ तासातच शोध घेऊन त्यांना मुद्देमालासह बेड्या ठोकल्या आहे. आलीम फिरोज खान, वय २८ वर्षे रा. राहुजीनगर,कल्याणरोड, आसीफ अस्लम शेख, वय ३५ वर्षे रा. लकड़ा मार्केट, अर्जुन बबन कनोजीया, वय २९ वर्षे रा. लकड़ा मार्केट, सुलतान मोहम्मद इकबाल पटेल, वय २९ वर्षे रा. शास्त्रीनगर व विशाल सुरेश भोईर, वय २८ वर्षे रा. सरवली पाडा,भिवंडी अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची (Robbers Arrested) नावे आहेत.

कंटेनरच्या पाठीमागील दरवाजाचे लॉक तोडुन चोरी : कंटेनर चालक सुरेश बच्चाई पाल, वय ३९ याने मुंबई नाशिक महामार्गवरील रांजनोली नाका परिसरातील वाटीका हॉटेल नजीक २० नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता टाटा कंपनीचा कंटेनर उड्डाणपुलालगत उभा करुन ठेवला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता कंटेनरच्या पाठीमागील दरवाजाचे लॉक तोडुन त्यामधून २ लाख ९९ हजार ४४० रुपये किंमतीचा डी. मार्ट कंपनीचा किराणा माल चोरीस गेल्याचे चालकाला दिसून आल्याने चालकाने कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटीलसह त्यांच्या पोलीस पथकाने या चोरीचा तपास सुरु केला.

मुद्देमाल जप्त : तपास सुरु करत असताना मुंबई नाशिक महामार्ग, आणि कल्याण - भिवंडी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषन करुन किराणा माल लुटणाऱ्या गुन्हयातील पाच दरोडेखोरांना कोनगाव पोलिसांच्या पथकाने अवघ्या २४ तासात बेड्या ठोकल्या, ( theft lakhs of groceries) शिवाय गुन्ह्यात वापरलेला टेम्पो व किराणा मालासह दोन दुचाकी असा १० लाख ७५ हजार ६५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती कोनगाव पोलिसांनी शनिवारी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.