ठाणे - येथील बदलापूर पूर्वमधील धुमाळ रिक्षा स्थानकावर प्रवाशाला रिक्षाचालकाने मारहाण केल्याची घडना घडली आहे. तसेच रिक्षाचालकाने प्रवाशाच्या अंगठ्याला करकचून चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. यात प्रवाशी जखमी झाला आहे. प्रताप सांडव असे प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- अमिताभ बच्चन यांनी बिलासपुर येथे घेतली चाहत्यांची भेट
बदलापूर पूर्व येथील मानकीवली गाव परिसरात राहणारे प्रताप सांडव हे पत्नीसह धुमाळ रिक्षा स्थानकावर उभ्या असलेल्या एका रिक्षात बसले. मात्र, लगेच ते रिक्षातून उतरून रेल्वे स्थानकाकडे पायी जाऊ लागले. त्यावेळी रिक्षाचालकाला राग आला. त्यामुळे रिक्षाचालकाने प्रताप यांच्यासह त्यांच्या पत्नीला मारहाण केली. त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला करकचून चावा घेतला. यात प्रताप हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.