ठाणे - अंबरनाथ शहरातील फॉरेस्ट नाका पेट्रोल पंपावर रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरताना अचानक स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, स्फोटामुळे रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला असून पेट्रोल पंपाचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे.
![thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-tha-8-riksha-blast-1-vis-3-photo-mh-10007_29102019184706_2910f_1572355026_863.jpg)
मंगळवारी सायंकाळी ४च्या सुमारास अंबरनाथ पश्चिमेतील फॉरेस्ट नाक्यावरील महानगर गॅस पेट्रोल पंपावर नेहमीप्रमाणे रांग लागली होती. यावेळी एका रिक्षात गॅस भरत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे रिक्षा अक्षरश: चक्काचूर झाला असून पेट्रोल पंपाचीही मोठ्याप्रमाणावर नासधूस झाली आहे. या घटनेनंतर पंपावरील सीएनजी सेक्शन बंद त्वरित करण्यात आले.
हेही वाचा - 'आठवड्यातील वार सत्तेसाठी वाटून घ्या आणि उरलेला रविवार आठवलेंना द्या', आव्हाडांची टीका
सदर घटनेची माहिती मिळताच महानगर गॅसचे अधिकारी, कर्मचारी पंपावर दाखल होत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या घटनेमुळे महानगर गॅस पेट्रोल पंप तसेच रिक्षांमध्ये लावलेल्या गॅस किट बनविणारी कंपनी या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
हेही वाचा - ठाण्यात युवकांचा अनोखा उपक्रम, किल्ल्यांच्या संवर्धनाने दिवाळी साजरी