ETV Bharat / state

Bullet Misfires At NCC Camp : ठाण्यात सरावावेळी मुलीला गोळी लागण्याचे प्रकरण; 5 जणांवर गुन्हा दाखल

मैदानात बेकादेशीर गोळीबाराच्या सरावावेळी अंगणात खेळणाऱ्या मुलीला मांडीला गोळी लागून गंभीर झाली ( Bullet Misfires At NCC Camp In Thane ) होती. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ( Shahapur Police Register Case Against Five People ) आहे.

girl injured as bullet Misfires
girl injured as bullet Misfires
author img

By

Published : Jun 5, 2022, 9:10 PM IST

ठाणे - शहापूर तालुक्यातील आत्मा अभियांत्रिक विद्यालयाच्या मैदानात बेकादेशीर गोळीबाराच्या सरावावेळी अंगणात खेळणाऱ्या मुलीला मांडीला गोळी लागून गंभीर झाली ( Bullet Misfires At NCC Camp In Thane ) होती. ही घटना शनिवारी ( 4 मे ) दुपारी साडेअकराच्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Shahapur Police Register Case Against Five People )आहे.

सर्वच आरोपी फरार - कमलकुमार खुर्रा ( एनसीसी कमांडर ), अरविंद साह ( गन इन्स्ट्रक्टर ), उमेश तुकाराम जाधव ( आत्मा मलिक संस्थेचे कार्याध्यक्ष ), डॉ. ज्ञानदेव शिंदे ( प्राचार्य ), गुलाब नेबवा हिरे ( एनसीसी कँम्प कोऑडिकेटर ), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर, कांचन राया कोरडे, असे गोळीबारात गंभीर जखमी मुलीचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच सर्वच आरोपी फरार झाल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेव्हल युनिटकडून गोळाबाराचा सराव - शहापूर तालुक्यातील अघई, ठाकूरपाडा परिसरात आत्मा अभियांत्रिक विद्यालयाच्या मैदानात संस्थेचे कार्याध्यक्ष, प्राचार्य यांनी पोलीस प्रशासनाची तसेच शासनाची किंवा वन विभागाची कुठलीही परवानगी न घेता, महाराष्ट्र बटालियन नेव्हल युनिट मुंबई यांच्या कमांडर व गन इन्स्ट्रक्टर यांना १ जून ते १० जून पर्यत गोळीबाराचा सराव करण्यास परवानगी दिली. त्यानुसार नेव्हल युनिटचे सुमारे ३६५ मुलं गोळीबाराचा सराव याठिकाणी करत होती. त्यातच जखमी कांचन ही ७ व्या वर्गात शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी शनिवारी शाळेला सुट्टी असल्याने घराबाहेर अंगणात खेळत होती. तेव्हाच गोळीबाराचा सराव सुरु असताना ७०० मीटरवरून आलेली बंदुकीची गोळी पाठीमागून तिच्या मांडीत घुसली. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली.

गोळीबारात जखमी मुलीची प्रकृती गंभीर - घटनेनंतर तिला गंभीर जखमी अवस्थेत शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती अधिकच खलावल्याने ठाण्यातील कळवा रुग्णालयात त्यानंतर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत शनिवारी रात्री उशिरा ५ आरोपी विरोधात भादंवि. कलम २८६, ३३८ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळेही स्थानिकांनी पोलिसांच्या तपासावर सवाल उपस्थित केला आहे.

गोळीबाराचा सराव होता बिनबोभाट सुरु - दरम्यान, तानसा हे वन्यजीवांसाठी संरक्षित अभयारण्य असून, मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलाशये देखील येथे आहेत. तरीही गोळीबाराचा सराव बिनबोभाट सुरु होता. याची माहिती ना ग्रामीण पोलिसांना, ना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे या घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षिक राजकुमार उपासे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा त्यांनी तपास सुरु असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही, अशी माहिती दिली. तसेच, बंदूक नेव्हीची अधिकृत असल्याने ऑर्म कायद्यानुसार कलम लावण्यात आले नाही. आजूबाजच्या लोकांना कोणत्याही प्रकारची सूचना दिली नसून, निष्काळजी पणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Salman Khan : सलमान खान आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.