मीरा भाईंदर(ठाणे) - मुंबई ठाण्याचे प्रवेशद्वार असलेला दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवर यांच्याकडे केली आहे. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा करण्यात आला आहे.
टोलनाक्यावर वाहतूक कोंडी
ठाणे मुंबई मीरा भाईंदर वसई विरार गुजरात राज्यात वाहतुकीसाठी दहिसर टोलवर थांबावे लागते. त्यामुळे या टोलनाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होतो. गेल्या अनेक वर्षांपासून दहिसर टोल बंद करण्यात यावा, अशीदेखील मागणी होत आहे. मात्र कोणत्याच सरकारने याबाबत योग्य निर्णय घेतले नाहीत. मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनीदेखील दहिसर टोल स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यापाठोपाठ आता खासदार राजन विचारे यांनी मागणी केली आहे.
नवी मुंबईप्रमाणे टोलनाके स्थलांतरित करावे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दहिसर ते मीरा-भाईंदर सुरू असलेल्या मेट्रो कामाचा पाहणी दौरा करण्यात आला. या दौऱ्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार उपस्थित होते. ज्याप्रमाणे नवी मुंबई, खारघर येथे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची टोल वसुली याच मार्गावर मात्र काही अंतराने केली जाते. त्यामुळे एकत्रित वाहतूक कोंडी निर्माण होत नाही. याच धर्तीवर दहिसर टोल नाक्याजवळ होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे टोल नाके पुढेमागे स्थलांतरित करण्यात यावे, अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली आहे.
हेही वाचा - विहंग सरनाईकबरोबर आ. प्रताप सरनाईक यांचीही आज चौकशी होण्याची शक्यता