ETV Bharat / state

'पुन्हा अन्याय झाला तर माझ्याकडे येवू नका' - ठाणे विधानसभा निवडणुका

नाशिकला पाच वर्षे विकास करूनही मनसेचा पराभव झाला, जे लोक काम करतात त्यांना निवडूण द्यायचे नाही, मग तुम्हाला हवं तरी काय ? असा प्रश्न उपस्थित करत जर अन्याय झाला तर पुन्हा माझ्याकडे येऊ नका, असा संताप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत व्यक्त केला.

राज ठाकरे
author img

By

Published : Oct 20, 2019, 9:06 AM IST

ठाणे - नाशिकला पाच वर्षे विकास करूनही मनसेचा पराभव झाला, जे लोक काम करतात त्यांना निवडणून द्यायचे नाही, मग तुम्हाला हवं तरी काय ? असा प्रश्न उपस्थित करत जर अन्याय झाला तर पुन्हा माझ्याकडे येऊ नका असा संताप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत व्यक्त केला आहे. जोपर्यंत तुम्हाला संताप येणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे सर्व भोगावंच लागणार असल्याचे राज ठाकरे यांनी मतदारांना ठणकावून सांगितले. राज ठाकरे यांची पालिका मुख्यालयाच्या समोर दुपारी झालेल्या जाहीर सभेसाठी मोठी गर्दी उसळली होती.

राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणामध्ये सरकारवर सडकून टीका केली आहे. मागील 12 दिवसांत बरंच बोललो आहे. संपूर्ण महाराष्ट्र मतदान करताना गेली पाच वर्षे खडतर गेली ती विसरू नका, डोळेझाक करू नका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. मराठी माणूस पिचला आहे. ठाण्यात मोडकळीस आलेल्या इमारतींचा आकडा मोठा आहे. हक्काची घरे सोडून भाड्याच्या घरात नागरिक आहेत. मात्र, यासंदर्भात अजूनही काही निर्णय होत नाही असे त्यांनी सांगितले. शाळेत आणि कॉलेजमध्ये प्रवेश देताना जात का बघतो यामध्येही सर्वजण भरडले जातात. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत जात आणि धर्म बघणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुका एक विनोद झाला आहे. निवडणुका जर गांभीर्याने घेतल्या नाहीत तर असच भोगावे लागणार, पाच लाख उद्योग बंद पडले असून याचा फटका ठाणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद बसला असल्याचे सांगत नाशिकला 20 हजार लोकांना काढून टाकले या सरकारनेच या नोकऱ्या घालवल्या असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. गड किल्ले भाड्याने देणे किती दरिद्री विचार आहेत.

हेही वाचा - 'गुजरात्यांनी आंदोलन केले की नेतेपद, आम्ही केली की खटले'

2000 च्या नोटा बंद करणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे आता पुन्हा नागरिक रांगेत उभे राहणार, गेल्या वेळी 80 नागरिक रांगेत उभे राहून मेले, एखाद्या पक्षाला असे बहुमत मिळाले की असे वाटेल ते निर्णय घेत असून हे घातक असल्याचे त्यांनी सांगितले .

एखाद्या सरकारने चांगलं काम केले तर कौतुक करेन, मी कोत्या मनाचा नाही म्हणाले. ठाण्यातील बेघर झालेल्या लोकांना आधी सांगा ते कधी हक्काच्या घरात जाणार मग 370 कलमचं बघू, असा टोलाही त्यांनी ठाण्यातील सत्ताधाऱ्यांना यावेळी लगावला.

मनसेच्या आंदोलनाचा अमराठी मुलांनाही फायदा झाला आहे, असेही ते म्हणाले. ठाणे आणि मुंबईचे आज काय झाले, इतर राज्यातच द्वेष नाही पण किती लोंढे अंगावर घ्यायचे. मराठी माणूस आधी मुंबईत राहायचा त्यानंतर मुंबईमधील मालाड, नंतर ठाणे, कल्याण आणि पुढेच सरकत गेला. ज्यांना निवडून दिले आहे त्यांनी त्याचे कर्तव्य केले पाच वर्षात केले का आणि हे आपण कधी विचारले का? राग का येत नाही तुम्हाला? नीट आणि अन्य परिक्षेवेळी आमच्याकडे येता. पण, काम न करणाऱ्या ना मते देता असे का? जर काम न करणाऱ्यांना मते द्यायची असतील तर पुन्हा अन्याय झाला तर माझ्याकडे येऊ नका, असा संताप त्यांनी जाहीर सभेत केला आहे.

हेही वाचा - डोक्यात हवा जाऊ देऊ नका, उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना सल्ला

Intro:पुन्हा अन्याय झाला तर माझ्याकडे येवू नका राज ठाकरेंचे ठाण्यात उद्विग्न वक्तव्य Body:नाशिकला पाच वर्ष विकास करूनही मनसेचा पराभव झाला, जे लोक काम करतात त्यांना निवडणून द्यायचे नाही, मग तुम्हाला हवं तरी काय ? असा प्रश्न उपस्थित करत जर अन्याय झाला तर पुन्हा माझ्याकडे येऊ नका असा संताप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत व्यक्त केला आहे . जोपर्यंत तुम्हाला संताप येणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे सर्व भोगावंच लागणार असल्याचे राज ठाकरे यांनी मतदारांना ठणकावून सांगितले. राज ठाकरे यांची पालिका मुख्यालयाच्या समीर दुपारी झालेल्या जाहीर सभेसाठी मोठी गर्दी उसळली होती.
राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणामध्ये सरकारवर सडकून टीका केली आहे . गेल्या 12 दिवसांत बरंच बोलो आहे .आखा महाराष्ट्र मतदान करताना गेली पाच वर्ष खडतर गेली ती विसरू नका ,डोळेझाक करू नका , असे आवाहन त्यांनी मतदारांना केले . मराठी माणूस पिचला आहे.ठाण्यात मोडकळीस आलेल्या इमारतींचा आकडा मोठा आहे ,हक्काची घरे सोडून भाड्यच्या घरात नागरिक आहेत मात्र यासंदर्भात अजूनही काही निर्णय होत नाही असे त्यांनी सांगितले. शाळेत आणि कॉलेज मध्ये प्रवेश देताना जात का बघतो यामध्येही सर्वजण भरडले जातात . त्यामुळे या सर्व प्रक्रियेत जात आणि धर्म बघणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले .
निवडणूका एक विनोद झाला आहे, निवडणूका जर गांभीर्याने घेतल्या नाहींत तर असंच भोगाव लागणार ,पाच लाख उद्योग बंद पडले असून याचा फटका ठाणे मुंबई नाशिक औरंगाबाद , बसला असल्याचे सांगत नाशिकला 20 हजार लोकांना काढून टाकले या सरकारनेच या नोकऱ्या घालवल्या असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले . गड किल्ले भाड्याने देणं किती दरिद्री विचार आहेत ,काय सांगायचं पुढच्या पिढीला ,शिवरायांचं नाव घेतो त्या किल्यावर लग्न समारंभ होणार त्यावर लग्नच होणार हा दिवळखोरीचा विचार आहे ,
2000 च्या नोटा बंद करणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे . त्यामुळे आता पुन्हा नागरिक रांगेत उभे राहणार ,गेल्या वेळी 80 नागरिक रांगेत उभे राहून मेले , एखाद्या पक्ष्याला असं बहुमत मिळालं की असे वाटेल ते निर्णय घेत असून हे घातक असल्याचे त्यांनी सांगितले .
एखाद्या सरकारने चांगलं काम केले तर कौतुक करेन ,मी कोत्या मनाचा नाही म्हणाले . ठाण्यातील बेघर झालेल्या लोकांना आधी सांगा ते कधी हक्काच्या घरात जाणार मग 370 कलमचं बघू, असा टोलाही त्यांनी ठाण्यातील सत्ताधाऱ्यांना यावेळी लगावला .
मुलांना ऍडमिशन कसं मिळणार ते सांगा ,असं राजकारण मला कळत नाही आणि जमत नाही , एखाद्याच काम होत असेल तर त्याची जात आणि धर्म बघायची गरज नाही , मनसेच्या आंदोलनाचा अमराठी मुलांनाही फायदा झाला आहे , असेही ते म्हणाले . ठाणे आणि मुंबईचं आज काय झालं ,इतर राज्यातच द्वेष नाही पण किती लोंढे अंगावर घायचे ,मराठी माणूस आधी मुंबईत राहायचा त्यानंतर मुंबईमधील मालाड, नंतर ठाणे ,कल्याण आणि पुढेच सरकार गेला , ज्यांना निवडून दिले आहे त्यांनी त्याचे कर्तव्य केले पाच वर्षात केले का आणि हे आपण कधी विचारले का ?संताप का येत नाही तुम्हाला ? नीट आणि अन्य परिक्षेवेळी आमच्याकडे येतात पण काम न करणाऱ्या ना मते देता असे का ? जर काम न करणाऱ्यांना मते द्यायची असतील तर पुन्हा अन्याय झाला तर माझ्याकडे येऊ नका असा संताप त्यांनी जाहीर सभेत केला आहे . Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.