ETV Bharat / state

ठाणे : अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य कार्यालय पाण्याखाली - ठाणे

अंबरनाथ नगरपरिषद मुख्य कार्यलयातच पावसाचे पाणी शिरल्याने सर्वच विभागाचे कामकाज बंद करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढावल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

अंबरनाथ नगरपालिका
अंबरनाथ नगरपालिका
author img

By

Published : Jul 19, 2021, 5:28 PM IST

Updated : Jul 19, 2021, 5:44 PM IST

ठाणे - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील विविध सखल भागात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहे. त्यातच चक्क अंबरनाथ नगरपरिषद मुख्य कार्यलयातच पावसाचे पाणी शिरल्याने सर्वच विभागाचे कामकाज बंद करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढावल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य कार्यालय पाण्याखाली
नागरिकांनी व्यक्त केला रोष

अंबरनाथ शहराला पावसाने रात्रीपासूनच झोडपून काढले. त्यामुळे शहरातील नाले तुंबले आहेत. विशेष म्हणजे शहरातील प्रमुख नाल्यांच्या सफाईला पावसाळ्यात सुरुवात केली होती. त्यामुळे शहरात पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे. अंबरनाथ शहरातील पूर्व भागात बहुतांशी भाग हा उंचावर असून तिथले पाणी वाहत येऊन बी केबिन रोडच्या नाल्याला मिळते. पुढे हाच नाला जाऊन वालधुनी नदीला मिळतो. त्यामुळे शहरातले पावसाचे सगळे पाणी वाहून नेण्याचे काम बी केबिन रोडचा नाला करतो. मात्र तरीदेखील या महत्त्वाच्या नाल्याच्या स्वच्छतेकडे अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने आज पावसाचे पाणी चक्क पालिकेच्या मुख्यालयात शिरल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नाल्याच्या काठी उभे असलेल्या अनधिकृत बाधंकामामुळे पाणी वाहून जाण्यास बहुतांश नाल्यात जागा उरली नाही. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिका नालेसफाई करते की शहरवासीयांची थट्टा? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

Last Updated : Jul 19, 2021, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.