ठाणे : मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतर गुरूवारी पहाटेपासून ठाणे जिल्ह्यासह शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. आजही पावसाने आपली जोरदार बॅटिंग सुरू ठेवली होती. ठाण्यात १ जून ते २७ जुलैपर्यंत २१४८.४४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर गुरूवारी दुपारी अडीच वाजता एका तासात तब्बल २४.८९ मिमी पाऊस पडला असल्याचे, ठाणे पालिकेच्या आपत्ती विभागाने सांगितले. दुपारी साडेतीनपर्यंत एकूण ६५.०० मिमी पाऊस बरसला आहे.
मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच : बुधवारी ठाणे जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले असून, ठाणे शहर पुन्हा जलमय झाले आहे. तर मध्य, हार्बरसह सर्वच रेल्वे मार्गावर धीम्या गतीने लोकल धावत आहेत. यामुळे चाकरमान्यांची ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांवर गर्दी पहायला मिळात आहे. मासुंदा तलावही ओसंडून वाहू लागल्याने, जांभळी नाका व बाजारपेठेत पाणी शिरले होते. तर वंदना परिसरात नेहमीपेक्षा जास्त पाणी वाढल्याने, वाहतूक पोलीस आणि आपत्ती विभाग येथे वाहनचालक व नागरिकांना रेस्क्यु करत होते. यावर्षी ठाणे शहराने मागील वर्षीचा एकूण पावसाचा रेकॉर्ड मोडला आहे. हवामान खात्याने ठाण्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने, रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून आली.
पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था : ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा दिल्याने, जिल्हा प्रशासन कामाला लागले होते. शिक्षण विभागाकडून रात्री उशिरा शाळांना सुट्टीचा आदेश देण्यात आला. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. जोपर्यंत शासन आदेश येत नाही तोपर्यंत शाळा सुट्टी जाहीर करता येत नाही. पहिला चाचणी परिक्षा जवळ आल्याने, सर्व शाळांतून अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या मागे शिक्षक लागले आहेत. तर अशा अचानक शाळाबंदीने पालक आणि शिक्षक दोघेही पेचात अडकले आहेत.
शहारत ९ ठिकाणी पाणी साचले :
- कृष्णा टॉवर जवळ सन्मान हॉटेलच्या बाजूला कापूरबावडी या ठिकाणी पाणी साचले.
- विटावा रेल्वे ब्रीज खाली पाणी साचले आहे. डीवॉटरींग पंप चालू केले.
- चिखलवाडी नौपाडा या ठिकाणी पाणी साचले आहे. डीवॉटरींग पंप चालू करण्यात आला.
- वंदना बस डेपो या ठिकाणी पाणी साचले आहे. डीवॉटरींग पंप चालू केला.
- भास्कर कॉलनी या ठिकाणी पाणी साचले आहे. डीवॉटरींग पंप चालू.
- पेड्या मारुती या ठिकाणी पाणी साचले.
- पोलिस अँटी करप्शन ब्युरो या ठिकाणी पाणी साचले.
- खान चाळ या ठिकाणी पाणी साचले आहे.
- बाबुभाई पेट्रोल पंप या ठिकाणी पाणी साचले आहे.
हेही वाचा -
- Thane Rain Update: तानसा धरण ओव्हरफ्लो, सात दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- Thane Flood : मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षापूर्वी मंजुरीसाठी पत्र दिलेला पूल कागदावरच; झोळी करुन महिलांनी न्यावे लागते रुग्णालयात!
- Adivasi women Problem : अडचणींचा पाऊस! ना रस्ते, ना आरोग्याची सुविधा; गरोदर महिला आदिवासी गावपाडे सोडून नातेवाईकांच्या आश्रयाला