ठाणे - उसंत घेतलेल्या पावसाने ठाणे शहरात पुन्हा जोरदार हजेरी लावलेली आहे. सकाळपासूनच संततधार पडणाऱ्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पावसाचा जोर वाढल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. पाच ते सहा ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून कोणतीही हानी झालेली नाही. दरम्यान, ठाण्यातील मासुंदा तलाव भरलेला दिसून येत आहे.