ठाणे - जिल्ह्यातील सर्वात मोठ्या विठ्ठल सायन्ना रुग्णालयाच्या शवागारात ठेवलेल्या २३ शवांचा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर उभा राहिला आहे. येथील शवागारात असलेली कुलिंग यंत्रणा बंद पडल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णालयाच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांना या दुर्गंदीचा प्रचंड त्रास होत होता. मात्र, रुग्णालय प्रशासनाने ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - ठाण्यात संतप्त प्रियकराचा विवाहित प्रेयसीच्या आईवर तलवारीने हल्ला
वातानुकूलित यंत्रणेच्या डागडुजीसाठी ही यंत्रणा बंद ठेवावी लगणार आहे. त्यामुळे हे २३ बेवारस मृतदेह ताब्यात घेण्याच्या सूचना संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे शल्यचिकित्सक कैलाश पवार यांनी दिली. संबंधित पोलीस ठाण्यांनी सूचनेची दखल घेत १८ मृतदेह येथून हलवून त्यांची रीतसर विल्हेवाट लावली असून उरलेले मृतदेह भिवंडी येथील शवागारात पाठवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
आपल्याकडे भिवंडी आणि मीरा भायंदर येथे अद्ययावत शवागार असून मृतदेह ठेवण्याची कोणतीही समस्या उद्भवली नसून त्यासंबधी तर्क वितर्काला उधान आले आहे. या आधी शासकीय रुग्णालयात स्ट्रेचर नसल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. दुर्लक्षामुळे उदंरानी मृतदेह कुरतडल्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालय आणि प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. आता या प्रकारमुळे लवकरात लवकर राज्य सरकार ने लक्ष घालावे, अशी मागणी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत.
हेही वाचा - खुन्नशीतून पाहण्यावरून वाद.. तरुणावर चाकूने वार, हल्लेखोर फरार