ETV Bharat / state

ठाणे कारागृहातून 9 कैद्यांचा पलायनाचा बेत फसला - कैद्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न

पलायनाच्या या कटात सहभागी असलेल्या एका कैद्याने याची कबुली दिली असून अधिक तपास करण्यात येत आहे.

ठाणे कारागृह
ठाणे कारागृह
author img

By

Published : Aug 4, 2020, 10:36 PM IST

ठाणे - कारागृहाची सुरक्षा ढिसाळ बनल्याचे समोर आले आहे. नळाच्या लोखंडी पाईपच्या साहाय्याने शिडी बनवून ठाणे कारागृहातून पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 9 कैद्यांचा डाव उघडकीस आला. मात्र, कारागृह पोलिसांचा बंदोबस्त असतानाही कैद्यांनी लोखंडी शिडी बनवली होती. ही शिडी सापडल्याने हे बिंग फुटले.

पलायनाच्या या कटात सहभागी असलेल्या एका कैद्याने याची कबुली दिली असून अधिक तपास करण्यात येत आहे. याबाबत कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांना वारंवार संपर्क साधुनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने सविस्तर माहिती समजू शकली नाही.

ठाणे मध्यवर्ती कारागृहात बॅरकच्या मागे असलेल्या शौचालयाच्या वर ठेवलेली ही 25 फुटी लोखंडी पाईपांची शिडी आढळली. कारागृहात पाईपांचा पुरवठा कुठुन व कसा झाला. याचा उलगडा झाला नसला तरी, याच शिडीचा वापर करून कैदी पलायन करणार होते. येथे बंदिस्त असलेल्या नऊ कैद्यांच्या या कटामुळे कारागृह प्रशासनाची मात्र झोप उडाली आहे. मात्र, वेळीच माहिती मिळाल्याने डाव फसला असून ते नऊ कैदी कोण याचा शोध घेण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.