ठाणे- १० जून ते १२ जून या तीन दिवसात वीज व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. सोमवारी रात्री सव्वानऊ वाजल्यापासून ठाण्यात पावसाने दमदार हजेरी लावली.
गेले अनेक दिवस उन्हाने काहिली झालेल्या ठाणेकरांना पहिल्याच पावसामुळे वातावरणात थंड गारवा अनुभवायला मिळाला आहे. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने