ETV Bharat / state

भिवंडीत ज्वलनशील केमिकल साठ्यावर पोलिसांची धाड, ८ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

तिर्थराज हरिलाल पाल ( ३४ रा. फादरवाडी ,वसई ) व विरल विजय गंबीया ( २६ रा.कोटेश्वर दीप ,भांडुप ) असे गजाआड केलेल्या केमिकल माफियांची नावे आहेत. या दोघांनी पुर्णा येथील द्रौपदी छाया कंपाऊंड परिसरातील एस.पी.ठक्करच्या ए टू झेड वेअर हाऊसमधील गोदाम क्र.३ व ८ यामध्ये ज्वलनशील केमिकलचा साठा केला होता. महत्वाचे म्हणजे, त्यांनी यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.

author img

By

Published : Oct 17, 2019, 7:15 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्याच्या पुर्णा येथील केमिकल गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकून ८ लाख ३५ हजार ९०० रुपये किंमतीचा केमिकल साठा जप्त केला. या प्रकरणी दोघा केमिकल साठा करणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

तिर्थराज हरिलाल पाल ( ३४ रा. फादरवाडी ,वसई ) व विरल विजय गंबीया ( २६ रा.कोटेश्वर दीप ,भांडुप ) असे गजाआड केलेल्या केमिकल माफियांची नावे आहेत. या दोघांनी पुर्णा येथील द्रौपदी छाया कंपाऊंड परिसरातील एस.पी.ठक्करच्या ए टू झेड वेअर हाऊसमधील गोदाम क्र.३ व ८ यामध्ये ज्वलनशील केमिकलचा साठा केला होता. महत्वाचे म्हणजे, त्यांनी यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.

दोघेही मानवी जीवीताला व पर्यावरणास धोकादायक असलेल्या ज्वलनशील केमिकलचा साठा करून त्याची परस्पर विक्री करत होते. याची खबर पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना मिळली. तेव्हा त्यांनी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मालोजी शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले.

त्यानूसार पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत कार्बो या ज्वलनशील केमिकलचा ८ लाख ३५ हजार ९०० रुपये किंमतीचा साठा (४०९ प्लास्टिक व लोखंडी ड्रम) जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या तिर्थराज व विरल या दोघांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - भाजप जिल्हाध्यक्षांशी विकासाच्या मुद्यांवर कार्यकर्त्यांची हमरीतुमरी; व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा - ठाण्यात खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी; शिळफाटा रोडवर झाला अपघात

Intro:kit 319Body:
भिवंडीत ज्वलनशील केमिकल साठ्यावर पोलिसांची धडक कारवाई ; दोघा केमिकल माफियांना अटक

ठाणे :- भिवंडी तालुक्याच्या पुर्णा येथील केमिकल गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकून ८ लाख ३५ हजार ९०० रुपये किंमतीचा केमिकल साठा जप्त केला. या प्रकरणी दोघा केमिकल मालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

तिर्थराज हरिलाल पाल ( ३४ रा. फादरवाडी ,वसई ) व विरल विजय गंबीया ( २६ रा.कोटेश्वर दीप ,भांडुप ) असे गजाआड केलेल्या केमिकल माफियांची नांवे आहेत. या दोघांनी पुर्णा येथील द्रौपदी छाया कंपाऊंड,एस.पी.ठक्कर येथील ए टू झेड वेअर हाऊसमधील गोदाम क्र.३ व ८ यामध्ये शासनाची कोणतीही परवानगी न घेता मानवी जिवीतास व पर्यावरणास धोकादायक असलेल्या ज्वलनशील केमिकलचा साठा करून त्याची परस्पर विक्री करीत होते. याची खबर पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना मिळताच त्यांनी नारपोली पोलीस ठाण्याचे वपोनि.मालोजी शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानूसार एपीआय के.आर. पाटील यांनी काल दुपारी पोलीस पथकासह गोदामावर छापा टाकून कार्बो या ज्वलनशील केमिकलचे ८ लाख ३५ हजार ९०० रुपये किंमतीचे ४०९ प्लास्टिक व लोखंडी ड्रम जप्त केले आहेत.या कारवाईत केमिकल माफिया तिर्थराज व विरल या दोघांना अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.