ETV Bharat / state

Silver Palace Bar Raid : 'सिल्वर पॅलेस' बारवर पोलिसांचा छापा; १७ बारबालासह १५ जणांवर गुन्हा - लीलाधर जेठालाल शाह

भिवंडीतील 'सिल्व्हर पॅलेस' बारवर पोलिसांनी छापा टाकला आहे. यात 17 बारबालांसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात नारपोली पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापक, वेटर, एक ग्राहक यांच्यासह 17 बारबालांसह 15 जणांना अटक केली आहे.

Silver Palace Bar Raid
Silver Palace Bar Raid
author img

By

Published : Jun 17, 2023, 9:27 PM IST

ठाणे : भिवंडीत ऑर्केस्टाबारच्या नावाखाली 'सिल्वर पॅलेस' बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नारपोली पोलिसांनी छापा टाकून १७ बारबालांसह हॉटेल व्यावस्थापकाला बेड्या ठोकल्या आहेत. यात हाॅटेल मॅनेजर, वेटर, ग्राहक अशा १५ जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्लील नृत्य सुरू असतानाच पोलिसांची एंट्री : भिवंडीतील जुना ठाणा-आग्रा रोडवर असलेल्या 'सिल्वर पॅलेस' या लेडीज बारमध्ये हा प्रकार घडला आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाने सुरू असलेल्या डान्सबारमध्ये उशिरापर्यंत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारबाला अश्लील हावभाव करीत असल्याची नारपोली पोलिसांना माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारावर पोलिसांनी १६ जून रोजी रात्रीच्या सुमारास बारवर छापा टाकत ग्राहकासह बारमधील कर्मचाऱ्यांना त्याब्यात घेतले आहे.

गुन्हा दाखल : त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत बार मॅनेजर, लीलाधर जेठालाल शाह (वय, ४१) वेटर अब्दुल कुरेशी, (वय ४२), ग्राहक गुलाब चरोटे ( वय २८), हकीमउद्दीन शेख (वय ४८), सागर कुमार प्रसाद कुमार (वय २८) रिपु रंजनकुमार शर्मा ( २८), राजू रईस शेख (वय ३५) , दिलीपकुमार विश्वकर्मा (वय४४), राजेंद्र विश्वकर्मा (वय २६) ) यांच्यासह १७ बारबालांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर आज ( शनिवारी ) पहाटेच्या सुमारास सहा. पोलीस निरीक्षक विजय कोळी ( वय ३७) यांच्या तकरीवरून नारपोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक पोलीस नारपोली पोलीस करीत आहेत.

अश्लील नृत्य करताना पकडले : यापूर्वीही भिवंडी तालुक्यातील दापोडे रोड असलेल्या ‘सपना’ लेडीज बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाने सुरु असलेल्या डान्स बारमध्ये उशिरापर्यत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारबाला अश्लील हावभाव करीत असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ४ एप्रिल रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास बारवर छापा टाकला होता. त्यावेळी बारमध्ये बसलेल्या ग्राहकांसमोर तोडक्या कपडयावर "जादू है नशा है" मदहोशीया है, या हिंदी गाण्यावर बारबाला अश्लील हावभाव करीत असल्याचे आढळून आले होते. त्यावेळी १० बारबालासह १३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा - Attempt To Abduct Hindu Girl : पब्जी गेम खेळत हिंदू मुलीशी ओळख; महाराष्ट्रात येऊन बिहारच्या नराधमांकडून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.