ETV Bharat / state

उल्हासनगर पोलीस ऍक्शन मोडवर; आरोपींची काढली वरात - परस्परविरोधी

उल्हासनगर ( Ulhasnagar ) शहरातील अनिल अशोक चित्रपटगृहाजवळ फॉरवर्ड लाईन रोडवर शुक्रवारी (दि. 26) रात्रीच्या सुमारास तीन आरोपींनी जो भेटेल त्याला मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, मध्यवर्ती पोलीस ( Police ) ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची रस्त्यावर वरात काढण्यात आली.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Nov 27, 2021, 7:38 PM IST

ठाणे - उल्हासनगर ( Ulhasnagar ) शहरातील अनिल अशोक चित्रपटगृहाजवळ फॉरवर्ड लाईन रोडवर शुक्रवारी (दि. 26) रात्रीच्या सुमारास तीन आरोपींनी जो भेटेल त्याला मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, मध्यवर्ती पोलीस ( Police ) ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उल्हासनगर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसून या गुंडांची दहशत कमी करण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर येत, आरोपींची शहरात रस्त्यावर फिरवत वरात काढली.

माहिती देताना पोलीस उपायुक्त

दोन गटातील हाणामारी सीसीटीव्हीत कैद...

सराईत आरोपी गुरबीत सिंग लबाणा याने प्रेम पोपटानी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले ते पैसे प्रेम यांनी देण्यास नकार दिल्याने गुरबीत सिंग लबाणा, आयलो सिंग लबाणा आणि बाबू सिंग लबाणा हे प्रेम यांना बेदम मारहाण करत असताना तिथे प्रेम यांची दोन मुले हिरो पोपटानी व प्रविण पोपटानी तिथे आली. तेव्हा या दोन गटात मारहाण सुरू झाली, यावेळी जो भेटेल त्यांना मारहाण केली. त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर या मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

नागरिकांमधील दहशत कमी करण्यासाठी गुनेहगारांची वरात...

या घटनेने शहरातील विविध परिसरात सराईत गुन्हेगांराची दहशत असल्याने पोलिसांनी आज पाच आरोपींना पकडून परिसरामध्ये त्यांची पायी वरात काढली. आरोपी अटक झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. या घटनेत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात लबाणा व पोपटानी यांनी परस्परविरोधी तक्रार दिल्याने. पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा - Thane Infant Sale Racket: बालकांची खरेदी-विक्री केलेल्या डॉक्टरला अटक केल्यावर ७१ बालकांची सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.