ETV Bharat / state

भिवंडीच्या धाडसी दरोड्याची 72 तासात उकल, म्होरक्याकडून सव्वा कोटींचा ऐवज हस्तगत - म्होरक्या

दरोडेखोरांनी बंदुकीचे धाक दाखवून तब्बल 1 कोटी 86 लाखांचा दरोडा घातला होता. याचा तपास 72 तासांत लावत पोलिसांनी एका आरोपीसह सव्वा कोटींचा ऐवज हस्तगत केला आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस पथक
जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस पथक
author img

By

Published : Feb 5, 2020, 8:31 AM IST

Updated : Feb 5, 2020, 9:37 AM IST

ठाणे - बंगल्यात घुसून बंदुकीच्या धाक दाखवून धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी सोन्याच्या ऐवजासह एक कोटी 86 लाखांचा ऐवज पळवला होता. हा प्रकार भिवंडीतील काल्हेरमध्ये 30 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या घडला होता. पण, पोलिसांनी शिताफीने घटनेचा तपास करत 72 तासांतच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.

माहिती देताना पोलीस आयुक्त

या घटणेने ठाणे पोलिसांसह संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. पोलिसांनी दरोड्यातील म्होरक्या धर्मेश रणछोड वैष्णव (वय 38 वर्षे, रा.ऐरोली) याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून सव्वा कोटींचा ऐवज हस्तगत केला. त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. या दरोड्यातील इतरांचा शोध सुरु आहे. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल सीडीआरच्या माध्यमातून या गुन्ह्याचा यशस्वी तपास करणाऱ्या दोन्ही पोलीस पथकांना प्रत्येकी 25 हजारांचे पारितोषिक जाहीर केले आहे, अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मंगळवारी (दि. 4 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत दिली.

भिवंडी, काल्हेर येथील गोदाम मालक व बांधकाम व्यावसायिक जगदीश पाटील यांच्या घरात 30 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. पाटील हे पहाटे मॉर्निंग वॉकला गेल्याची संधी साधून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी बेडरूममध्ये झोपलेल्या पाटील यांच्या पत्नी व मुलीला बंदुकीचा धाक दाखवून दोरीने त्यांचे हातपाय बांधले. नंतर तिजोरीतील 60 लाखांची रोकड व 421 तोळ्याचे सोन्याचे दागीने असा 1 कोटी 86 लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले होते. या गुन्ह्याची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा - कल्याणचे आंदोलन मागे; तर भिवंडीत 'शाहीनबाग' सुरूच

दरम्यान, पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी या दरोड्याची गंभीर दखल घेत 8 पथकांकडे तपास सोपवला होता. पथकांनी समांतर तपास करून घटनास्थळचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास करून धर्मेश वैष्णव या सराईत दरोडेखोराला ऐवजाच्या बॅगेसह अवघ्या 72 तासात अटक केली. धर्मेशच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. धर्मेश याला दरोड्याप्रकरणी गुजरात राज्यात 10 वर्षांची शिक्षा झाली असून सध्या तो जामिनावर बाहेर आहे. तुरुंगात ओळख झालेल्या साथीदारांना हाताशी धरून त्याने हा दरोड्याचा कट रचला होता, अशी माहिती पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी दिली.

हेही वाचा - ...तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त होईल - एकनाथ शिंदे

Intro:भिवंडीच्या धाडसी दरोड्याची 72 तासात उकल म्होरक्याकडून सव्वा कोटींचा ऐवज हस्तगत
Body:
बंगल्यात घुसून बंदुकीच्या धाकाने धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी सोन्याच्या ऐवजासह एक कोटी 86 लाखांचा मुद्देमाल पळवला होता.भिवंडीतील काल्हेरमध्ये 30 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या पडलेल्या या दरोड्याने ठाणे पोलिसांसह संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.मात्र,चाणाक्ष पोलिसांनी अहोरात्र तपास करून अवघ्या 72 तासात या दरोड्याचा पछडा लावला आहे.पोलिसांनी दरोड्यातील म्होरक्या धर्मेश रणछोड वैष्णव (38) रा.ऐरोली याच्या मुसक्या आवळून सव्वा कोटींचा ऐवज हस्तगत केला.ठाणे न्यायालयाने त्याला दहा दिवसांची कोठडी सुनावली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.घटनास्थळाचे सीसी टिव्ही फुटेज आणि मोबाईल सीडीआरच्या माध्यमातून या गुन्ह्याचा यशस्वी तपास करणाऱ्या दोन्ही पोलीस पथकांना प्रत्येकी 25 हजारांचे पारितोषिक जाहीर केले आहे.अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडी,काल्हेर येथील गोदाम मालक व बांधकाम व्यावसायिक जगदीश पाटील यांच्या घरात 30 जाने.रोजी पहाटेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता.पाटील पहाटे मॉर्निंग वॉकला गेल्याची संधी साधून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी बेडरूममध्ये झोपलेल्या पाटील यांच्या पत्नी व मुलीला बंदुकीचा धाक दाखवून दोरीने त्यांचे हातपाय बांधले.नंतर तिजोरीतील 60 लाखांची रोकड व 421 तोळ्याचे सोन्याचे दागीने असा 1 कोटी 86 लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले होते.या गुन्ह्याची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान,पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी या दरोड्याची गंभीर दखल घेत आठ पथकांकडे तपास सोपवला होता.पथकांनी समांतर तपास करून घटनास्थळीच सीसी टीव्ही फुटेज व तांत्रिक तपास करून धर्मेश वैष्णव या सराईत दरोडेखोराला ऐवजाच्या बॅगेसह अवघ्या 72 तासात अटक केली.धर्मेशच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.धर्मेश याला दरोड्याप्रकरणी मध्यप्रदेश राज्यात दहा वर्षांची शिक्षा झाली असून सध्या तो जामिनावर बाहेर आहे.तुरुंगात ओळख झालेल्या साथीदारांना हाताशी धरून त्याने हा दरोड्याचा कट रचला होता.अशी माहिती पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी दिली.
Byte विवेक फनसळकर पोलिस आयुक्त ठाणेConclusion:
Last Updated : Feb 5, 2020, 9:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.