ETV Bharat / state

हत्येचा धक्कादायक उलगडा; दाराच्या फटीतून सबंध बघतो म्हणून केली रिक्षाचालकाची हत्या - गुन्हे बातमी

एक रिक्षाचालक सार्वजनिक शौचालयात प्रातःविधीसाठी गेला असता, अज्ञात व्यक्तींकडून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. ही घटना कल्याण पश्चिम भागातील उंबर्डे गावात शनिवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणाच्या पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून मृत रिक्षाचालक शेजारी राहणाऱ्या एका घरातील दाराच्या फटीतून वहिनी व भावाच्या बेडरूममध्ये पाहत असल्याने रिक्षाचालकाची दिरानेच निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. सोपान पंजे (वय 23 वर्षे), असे अटक आरोपीचे नाव आहे. अभिमान भंडारी (वय 51 वर्षे), असे निर्घृण हत्या झालेल्या रिक्षाचालकाच नाव आहे.

न
आरोपीसह पोलीस पथक
author img

By

Published : Nov 22, 2021, 10:31 PM IST

ठाणे - एक रिक्षाचालक सार्वजनिक शौचालयात प्रातःविधीसाठी गेला असता, अज्ञात व्यक्तींकडून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. ही घटना कल्याण पश्चिम भागातील उंबर्डे गावात शनिवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणाच्या पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून मृत रिक्षाचालक शेजारी राहणाऱ्या एका घरातील दाराच्या फटीतून वहिनी व भावाच्या बेडरूममध्ये पाहत असल्याने रिक्षाचालकाची दिरानेच निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. सोपान पंजे (वय 23 वर्षे), असे अटक आरोपीचे नाव आहे. अभिमान भंडारी (वय 51 वर्षे), असे निर्घृण हत्या झालेल्या रिक्षाचालकाच नाव आहे.

माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त

सार्वजनिक शौचालयात जात असतानाच हत्या..

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात रिक्षाचालक अभिमान भंडारी हे कुटुंबीयासह राहत होते. त्यातच शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर असलेल्या गावातील सार्वजनिक शौचालयात गेले होते. त्यावेळी दबाधरून बसलेल्या आरोपीने धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या करून तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिमान यांना रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. तर खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता.

विकृती ठरली हत्येचे कारण...

आरोपी सोपान हा वहिनी व दादा सोबत राहतो. तर मृत अभिनव हा त्याच्या शेजारी राहत होता. मृताला शेजाऱ्या घरातील बेडरूमकडील खिडकीच्या फटीतून पती-पत्नीचे संबध पाहण्याची विकृत सवय होती. त्यातच काही दिवसांपासून आरोपी सोपानला या विकृतीची खबर लागली. त्यानंतर त्याने यापूर्वीही मृत अभिमानला दोन ते तीन वेळा समज देऊन दाराच्या फटीतून बघू नकोस म्हणून सांगितले होते. तरीही मृत रात्री-अपरात्री दाराच्या फटीतून बेडरूमध्ये पाहतच होता. याच विकृतीने त्याचा घात केला. पोलिसांनी आरोपीच्या शोधात 4 ते 5 पथके तयार केली होती. या पोलीस पथकांना आरोपीला 24 तासातच अटक करून हत्येचा उलगडा करण्यात यश आले.

हे ही वाचा - पोलिसाचे घृणास्पद कृत्य.. गर्लफ्रेंडचा मोबाईल नंबर दिला नाही म्हणून तरुणावर व्हिडिओ शूट करत अनैसर्गिक अत्याचार..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.