ETV Bharat / state

Thane Snake : विषारी सापांचा मानवीवस्तीसह रस्त्यांवर वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - ठाणे साप बातमी

एकाच दिवसात कल्याण पश्चिमेकडील परिसरातील मानवीवस्तीसह रहदारीच्यातून ३ विषारी-बिन विषारी साप सर्पमित्राने पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.

Thane Snake news
Thane Snake news
author img

By

Published : Nov 21, 2021, 9:12 AM IST

ठाणे - हवामानातील बदलावामुळे विषारी-बिन विषारी साप मानवीवस्तीत शिरल्याच्या घटना सतत घडत आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवसात कल्याण पश्चिमेकडील परिसरातील मानवीवस्तीसह रहदारीच्यातून ३ विषारी-बिन विषारी साप सर्पमित्राने पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.

व्हिडीओ

भक्ष्य शोधण्यासाठी व थंडीपासून बचावासाठी -

नवीन कल्याण म्हणून ओळख निर्माण झालेल्या पश्चिमेकडील परिसरात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून अचानक वातावरण बदल्याने बिळातून विषारी-बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी व थंडीपासून बचावासाठी मानवीवस्तीत शिरत असल्याच्या घटना घडत असतानाच कल्याण पश्चिममधील वाडेघर सर्कल तेथील रस्त्यावरच एका नागरिकाला भलामोठा काळ्या रगांचा अंगावर चट्टेबट्टे असलेला साप दिसला. मात्र, सापाला पाहून भर रस्त्यावर गोंधळ उडाला होता. तर कारभारी नावाच्या व्यक्तीने या सापाची माहिती सर्पमित्र हितेश यांना दिली. सर्पमित्र हितेश घटनस्थळी येऊन या सापाला पकडून पिशवीत बंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप घोणस जातीचा असून ५ फूट लांबीचा होता. तर घोणस जातीचा साप खूपच विषारी असल्याची माहिती सर्पमित्राने दिली.

विषारी कोब्रा नाग मुजराच्या खोलीत -

दुसऱ्या घटनेत कोळीवली गावात एका गृह संकुल उभारणीचे काम सुरु आहे. या ठिकाणी मजुरांना राहणाऱ्यांसाठी पत्र्याच्या खोल्या उभारण्यात आल्या, याच पत्र्याच्या खोलीत भिंती लगत विषारी कोब्रा नाग सिमेंट साहित्यात शिरला होता. यामुळे मजुरांमध्ये पळापळ झाली होती. तर खोलीत शिरल्याची माहिती साईट सुपरवाईजरने सर्पमित्र हितेश यांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्र हितेश यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या विषारी सापाला पकडले. हा साप ५ फूट लांबीचा असून अंत्यत विषारी अश्या कोब्रा जाती होता. सर्पमित्राने या कोब्रा नागाला पकडून पिशवीत बंद केल्याने कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला.

लांबलचक साप टायर पंक्चर दुकानाच्या समोर -

तिसऱ्या घटनेत एक लांबलचक साप निक्कीनगर मधील टायर पंक्चरच्या दुकानाभवती रस्त्यावर फिरत असल्याचे दुकानदार भंडारी यांनी पहिले असता दुकान मालकाने सर्पमित्र हितेश यांना दिली. त्यानंतर सर्पमित्र हितेश काही वेळातच घटनास्थळी येऊन या सापाला पकडले. हा साप ६ फूट लांबीचा असून धामण जातीचा होता. साप पकडल्याचे पाहून दुकानदारसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला.

निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवदान

या तिन्ही विषारी-ॉबिन विषारी सापांना वन विभागाच्या अधिकाऱ्याची परवागी घेऊन जंगलात आज निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र हितेश यांनी दिली. मात्र, हवामानात बदल झाल्याने साप भक्ष्य व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवीवस्तीत शिरत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे असून कुठेही मानवीवस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना याची माहिती तत्काळ देण्याचे अहवान करण्यात आले.

हेही वाचा - Devendra Fadnavis In Amravati : हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.