ETV Bharat / state

भिवंडीत एमआयएमच्या खंडणीखोर अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल - भिंवडी बलात्कार बातमी

भिवंडीतील एमआयएमच्या खंडणीबहाद्दर शहराध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तो खंडणीच्या प्रकरणात न्यायलयीन कोठडीत आहे.

आरोपी गुड्डू
आरोपी गुड्डू
author img

By

Published : Oct 4, 2020, 9:22 PM IST

ठाणे - भिवंडी शहरातील विविध पोलीस ठाण्यात खंडणी उकळल्या प्रकरणी चार गुन्हे दाखल असलेल्या एमआयएम शहराध्यक्ष खालिद उर्फ गुड्डू मुख्तार शेख याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली असून खंडणीबहाद्दर खालिद गुड्डू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, भिवंडी शहरात राहणारी 27 वर्षीय पीडित विवाहित महिला आपल्या अटक असलेल्या पतीला जामीन मिळवून द्यावा, यासाठी मदतीच्या अपेक्षेने आरोपी खालिदकडे गेली होती. डिसेंबर 2016 ते डिसेंबर 2017 या कालावधीत भिवंडीतील समदनगर येथील खालिदच्या कार्यालयात व धामणकर नाका येथील स्टार हॉटेलवरील कार्यालयात वेळोवेळी पीडित महिलेला बोलावून तिच्याशी आरोपी खालिदने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, अशी तक्रार पीडित महिलेने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

पीडितेच्या तक्रारीवरुन खंडणीबहाद्दर खालिद विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.चे कलम 376, 345, 384 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकडे आरोपी खालिद हा खंडणी प्रकरणातील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे.

हेही वाचा - मित्राच्या वाढदिवसाला जाणाऱ्या कॉलेज युवकावर काळाचा घाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.