ETV Bharat / state

Durgadi Fort Fraud Case: ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच बनावट कागदपत्रांच्या आधारे केला नावावर; आरोपीला अटक - Durgadi Fort Forged Document

Durgadi Fort Fraud Case : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम भागातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची (Durgadi Fort Forged Document) जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे एका व्यक्तीने आपल्या नावे केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी नवीमुंबई परिसरातून सुयश शिर्के याला अटक करण्यात आली आहे.

Durgadi Fort Fraud Case
किल्ला बनावट कागदपत्रांच्या आधारे नांवावर करणाऱ्या अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 10:14 PM IST

ठाणे Durgadi Fort Fraud Case : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अश्या कल्याण पश्चिम भागातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाचे बनावट कागदपत्रे तयार (Durgadi Fort Forged Document) करून, किल्लाच नावावर करणाऱ्या ठगाला महात्मा फुले चौक पोलिसांनी सापळा रचून नवीमुंबई परिसरातून अटक केली आहे. सुयश शिर्के असे अटक केलेल्या आरोपीच नाव असून तो नवीमुंबईतील खांदा कॉलनी परिसरात राहणार आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे केलं काम : बंटी–बबली या हिंदी चित्रपटात ताजमहल आपल्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करण्याचा प्रसंग या दाखविण्यात आला होता. अश्याच प्रकारे कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच्या जागेचे वंशज दाखूवन, बनावट कागदपत्रांच्या आधारे शिर्केने आपल्या नावाने केला. मात्र जागा विक्री होण्यापूर्वीच हा प्रकार कल्याण मंडळ अधिकारी प्रीती घुडे यांच्यामुळे उघडकीस आला आहे. घुडे यांनी २ नोव्हेंबर रोजी सुयश शिर्के (सातवाहन ) यांच्यावर भादंवि कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१ , ७७३, प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

कागदपत्रांवर शिक्के आणि बनावट सह्या : अटक सुयश शिर्के याने १२ सप्टेंबर २०२२ रोजी किल्ल्याची जागा आपल्या नावाने करण्यासाठी नाहरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जात त्याने शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख केला होता. कल्याण तहसील कार्यालयातील ५ ते ७ कागदपत्रांवर शिक्के आणि बनावट सह्या असलेले कागदपत्र अर्जसोबत जोडले होते. सदरच्या जागेचे प्रकरण ऐतिहासिक किल्ल्याविषयी असल्याने मंजुरीसाठी जिल्हा अधिकारी कार्यलयात पाठविण्यात आले होते.

असा उघडकीस आला प्रकार : दरम्यानच्या काळात किल्ल्याची जागा व बंदर यावर कोणाची मालकी आहे. या माहितीसाठी स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यलयाशी पत्र व्यवहार केला. किल्ल्या संदर्भात लेखी माहिती मागवली असता, सदरची जागा शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने त्यांच्याकडून दुरुस्तीची परवानगी दयावी असा उल्लेख करत पोलिसांना कळविण्यात आले. दुसरीकडे कल्याण मंडळ अधिकारी कार्यलयात या किल्ल्याच्या जागे संदर्भात २४ फेब्रुवारी २०२३ रोजी दस्तावेज तपासणी दरम्यान, कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट लेटरसह अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी केलेल्या दस्तावेज आढळून आल्याने, हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता.

मुंबई परिसरातून अटक : या संर्दभात पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील यांनी माहिती दिली की, आरोपी सुयश शिर्के याला ८ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई परिसरातून अटक केली आहे. त्याच्याजवळून आणखी काही बनावट स्टॅम्प आणि कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहे. अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Durgadi Fort Fraud Case : बापरे! ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच बनावट कागदपत्रांच्या आधारे केला नावावर
  2. Case of bank fraud : बँकेतील 1 कोटी 29 लाख रुपये फसवणूक प्रकरणी एकास अटक; इतर साथीदारांचा शोध सुरू
  3. Bank Fraud : नामांकित कंपन्या व बिल्डर्स लॉबीचा बँकेला साडेसहा कोटींचा गंडा; फसवणूकदारांविरुद्ध तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.