ETV Bharat / state

खासगी शाळांच्या फी वसुलीविरोधात पालक आक्रमक; पालिका मुख्यालयावर काढला मोर्चा

author img

By

Published : Sep 10, 2020, 10:30 PM IST

राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः सर्व शाळा पूर्णपणे सुरू होईपर्यंत कोणत्याही प्रकारची फी पालकांनी भरू नये, असे आदेश दिले होते. तरीही मीरा भाईंदरमधील खासगी शाळा पालकांना वारंवार फोन व मॅसेजकरून आपआपल्या पाल्यांची संपूर्ण वर्षाची फी-भरण्यास सांगत आहेत.

thane
खासगी शाळांच्या फी वसुलीविरोधात पालक आक्रमक

मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा भाईंदरच्या अनेक खासगी शाळांमध्ये लूटमार सुरू आहे. अनेक पालकांच्या पाल्यांना तर आरटीई कायद्याअंतर्गत प्रवेश मिळून सुद्धा पालिकेच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. ते ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असून याकरिता शहरातील अनेक पालकवर्गांनी थेट आपला मोर्चा पालिका मुख्यालयाकडे वळवत आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा, कॉलेज बंद असतानाही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवले जात असून देखील विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी खासगी शाळांकडून पालकांना जबरदस्ती तगादा सुरू केला जात आहे. याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने मीरा भाईंदरमधील सर्व पालकांनी गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास पालिका मुख्यालय परिसरात एकत्र येत खासगी शाळांकडून फी भरण्यासाठी सुरू असलेल्या अट्टाहासाविरुद्ध आवाज उचलत आंदोलन केले.

राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः सर्व शाळा पूर्णपणे सुरू होईपर्यंत कोणत्याही प्रकारची फी पालकांनी भरू नये, असे आदेश दिले होते. तरीही मीरा भाईंदरमधील खासगी शाळा पालकांना वारंवार फोन व मॅसेजकरून आपआपल्या पाल्यांची संपूर्ण वर्षाची फी-भरण्यास सांगत आहेत. अगोदरच लॉकडाऊनमध्ये सर्व सामान्य लोकांचे कंबरडे मोडले तर अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आर्थिक परिस्तिथी अनेकांची अत्यंत हालाकीची झाली आहे. त्यातच शाळा बंद असून सर्व शिक्षक घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. मात्र, त्यात ज्यांनी फी भरली नाही किंवा ज्यांचे आरटीईअंतर्गत प्रवेश मिळाला आहे त्यांना मुद्दाम जाणीवपूर्वक ऑनलाइन धडे देत नाहीत, अशी पालिका वर्गांनी आयुक्तांना तक्रार केली.

याकरिता शाळेला काहीही खर्च लागत नाही, मात्र तरी देखील मीरा भाईंदरमधील खासगी शाळा पालकांना वारंवार फोन करून आपल्या पाल्याची पूर्ण वर्षाची फी-भरण्यास सांगत आहेत. पालकांच्या मते जेव्हा शाळा सुरळीतपणे सुरु होतील त्या महिन्यापासून फी शाळेने घ्यावी. या विषयाला घेऊन पालक मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन तसेच काही नगरसेवक यांच्याकडे देखील गेले होते. मात्र, सर्वानी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप पालक करत आहेत. फक्त राजकीय लोकांना फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतात. अखेरकार गुरुवारी शेकडोच्या संख्येत पालकांनी एकत्र येत फी भरण्याविरुद्ध आवाज उठवला.

यावेळी जमलेल्या सर्व पालकांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या आहेत. सर्व पालकांनी यात सेव्हन स्क्वेअर शाळा भाईंदर पूर्व व आर.बी.के. ग्लोबल इंटरनॅशनल शाळा आणि मिरारोडच्या नयानगरमधील एका शाळेतसुद्धा फी घेण्याासठी तगादा लावल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले. आपआपल्या शाळाकडून होणाऱ्या त्रासांबद्दल सांगत त्यावर चर्चा करण्यात आली. खासगी शाळांकडून करण्यात येणाऱ्या फी वसुलीला पालकांच्या ताफ्याकडून नकार देण्यात आला आहे. सरकारने लवकर निर्णय घ्यावा, असे पालकांनी सांगितले आहे.

टाळेबंदीनंतर ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये माझ्या मुलाचे शाळेतील शुक्ल न भरल्याने ऑनलाइन शिकवणी बंद केले आहे, जेव्हा फी भरली जाईल तेव्हाच विद्यार्थ्याला शिकवण्यात येईल, असे शाळेकडून सांगण्यात आले आहे, असे संतप्त पालक भावेश पाटील म्हणाले. शासनाने राईट टू एज्युकेशन केले आहे, मात्र त्याची अंमलबजावणी मीरा भाईंदरमध्ये होताना दिसत नाही, म्हणून माझ्या पाल्यांचे अॅडमिशन आजही झालेले नाही, तर शिक्षण विभाग मात्र अक्षरशः झोपेत असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती पालक श्वेता धायगोंडे यांनी ईटीव्ही भारत ला दिली. माझ्या पाल्यांचा मी पहिला हप्ता बारा हजारांचा भरला आहे, मात्र त्यांनी माझ्याकडे फी भरण्याचा तगादा लावला असून माझ्या मुलाला शाळेत ऑनलाइन धडेसुद्धा देत नाहीत, अशी प्रतिक्रिया पालक सुनिता जाधव यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.