ETV Bharat / state

मीरा-भाईंदरमध्ये शाळांकडून शुल्कवाढ; शाळांमध्ये समिती स्थापन करण्याची मागणी

author img

By

Published : Nov 6, 2020, 7:13 PM IST

Updated : Nov 6, 2020, 7:54 PM IST

शालेय शुल्काबाबत एक नियंत्रण समिती गठीत करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष शान पवार यांनी प्रभारी सहायक शिक्षण अधिकारी विजय वाकडे यांना लेखी पत्र देऊन केली आहे.

parents agitation against Increased fee in  Mira Bhayandar
मीरा-भाईंदरमध्ये शाळांकडून शुल्कवाढ

मीरा भाईंदर (ठाणे) - कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये व्यवसायांचे नुकसान झाले आणि अनेक व्यवसाय बंद पडले. त्यामुळे लाखो जणांचे रोजगारदेखील गेले. याच दरम्यान, शाळेकडून वाढीव शुल्काची मागणी होत आहे. मात्र, बऱ्याच नोकरी गमावलेल्या पालकांना वाढीव शुल्क परवडणारे नाही. याच पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमध्ये अनेक पालकांनी शाळेच्या आवारात तसेच मनपा मुख्यालयात आंदोलन केले आहे. शालेय शुल्काबाबत एक नियंत्रण समिती गठीत करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष शान पवार यांनी प्रभारी सहायक शिक्षण अधिकारी विजय वाकडे यांना लेखी पत्र देऊन केली आहे.

कोरोना काळात बऱ्याच पालकांचे रोजगार सुटलेले आहेत. काहींच्या घरात तर खाण्या-पिण्याच्या देखील समस्या निर्माण झाल्या आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिकेत शिक्षण व्यवस्था सांभाळणारे शिक्षण अधिकारी देखील नियमित अनुपस्थित असल्या कारणाने त्यांचे शहराच्या कोणत्याच शाळेच्या घडामोडीवर लक्ष नाही. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांची सतत लूटमार होत आहे. सध्याच्या शैक्षणिक वर्षी कोणत्याही शाळेने परीक्षा घेऊ नये तसेच पालकांना शाळेत बोलावून घेऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, तरीदेखील प्रत्येक शाळा परीक्षा घेऊन तसेच शुल्कासंदर्भात पालकांना व विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देत आहे.

शुल्कवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमिटी स्थापन करण्याची मागणी -

ज्या प्रकारे घरपट्टी वसुलीसाठी, फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमिटी आहे, त्याच धर्तीवर शाळेद्वारे विद्यार्थी आणि पालकांवर लादल्या जाणाऱ्या शुल्कवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने एक कमिटी तयार करावी. अशी कमिटी तयार केल्यास पालकांना होणार त्रास कमी होईल, अशी मागणी शान पवार यांनी केली. पवार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या अनुपस्थित प्रभारी सहाय्यक शिक्षण अधिकारी विजय वाकडे यांच्याकडे मागणीचे पत्र दिले.

Last Updated : Nov 6, 2020, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.