ETV Bharat / state

Nirmalya Donation: ठाण्यात निर्माल्य दानातून होणार सेंद्रिय खत निर्मिती - निर्माल्य दानातून होणार सेंद्रिय खत निर्मिती

गेली आठ वर्षे रायलादेवी परिसरात स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या ( Nanasaheb Dharmadhikari Foundation ) वतीने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनचा उपक्रम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत १५०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून गणपती विसर्जन ( Ganpati Visarjan 2022 ) वेळी विद्यार्थीच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Organic Fertilizer will Be Produced
सेंद्रिय खत निर्मिती
author img

By

Published : Sep 10, 2022, 1:48 PM IST

ठाणे : गेली आठ वर्षे रायलादेवी परिसरात स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या ( Nanasaheb Dharmadhikari Foundation ) वतीने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनचा उपक्रम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत १५०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून गणपती विसर्जन ( Ganpati Visarjan 2022 ) वेळी विद्यार्थीच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. कोविड नंतर यंदाचा गणेशोत्सव ( Ganeshotsav 2022) मोठ्या उत्साहात साजरा होत असल्यामुळे निर्माल्याचे प्रमाण वाढले आहे. तर प्लॅस्टिक, थर्माकोल निर्मूलन सातत्याने जनजागृती केली जात असल्याने यावर्षी जवळपास ९५टक्के थर्माकोल कचरा कमी झाला असल्याचे सांगण्यात आले.

ठाण्यात निर्माल्य दानातून होणार सेंद्रिय खत निर्मिती

निर्माल्य व्यवस्थापनाचा उपक्रम - रायलादेवी घाटावर दिड, पाच,आणि सात दिवसांच्या विसर्जनाच्या ( Ganpati Visarjan 2022 ) वेळी एक टन कचरा जमा झाला असून समर्थ भारत व्यासपीठ महिलांकडून फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून त्या कंपोस्ट खताच्या खड्ड्यात ठेवल्या जातात आणि १५ दिवसानंतर खतनिर्मिती झाल्यावर रायलादेवी परिसरातील झाडांसाठी त्याचा उपयोग केला जातो. निर्माल्य संकलनाच्या १२ वर्षाच्या तपश्चयनंतर यंदा शुध्द, सात्विक स्वरूपातील निर्माल्य संकलीत करायला मिळाले ही एक प्रकारे बाप्पाची कृपा आहे. बाप्पानेच सर्वांना सुबुद्धी दिली आणि बाप्पाचा हा उत्सव अधिक पर्यावरण स्नेही झाला असून त्यानेच हे घडवून आणले आहे. अशी माहिती समर्थ भारत व्यासपीठ या सामाजिक संस्थेचे बटू सावंत यांनी दिली. ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य व्यवस्थापनाचा उपक्रम हाती घेऊन एक तप अर्थात १२ वर्ष झाली आहेत.

बाप्पाचा प्रसाद म्हणून खत वाटप - ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून ओळख आहे. ज्यावेळी हा निर्माल्य संकलनाचा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली त्यावेळी भाविकांनी प्रचंड प्रमाणात विरोध केला होता.आमच्या बाप्पाचे निर्माल्य हे तलावातच विसर्जित झाले पाहिजे अशी भूमिका होती. परंतू १२वर्षाच्या तपश्चर्येचे नंतर बदलत जाऊन आज ९८टक्के निर्माल्य प्लॅस्टिक आणि थर्माकोलविना दिसत आहे. याचे समाधान आहे. सफाई सेवकांच्या माध्यमातून संकलित निर्माल्यातून फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून त्याचे खत तयार करण्यात ( Organic Fertilizer will Be Produced ) येते आणि हे खत छोट्या छोट्या बॅगा मधून भरून सोसायट्यांमधून बाप्पाचा प्रसाद म्हणून खत स्वरूपात देण्यात येत असल्याचे बटू सावंत यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.