ETV Bharat / state

Septic Tank Explosion : भिवंडीत सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टीक टँकचा स्फोट; एकाचा मृत्यू तर दोन जखमी

author img

By

Published : Feb 25, 2022, 5:18 PM IST

Updated : Feb 25, 2022, 5:58 PM IST

भिवंडी महानगरपालिका (Bhiwandi Corporation) क्षेत्रातील चव्हाण कॉलनी येथील एका सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टीक टँकमध्ये जोरदार स्फोट (septic tank explosion) झाल्याची घटना घडली आहे. यात एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

septic tank explosion
सेप्टीक टँकचा स्फोट

ठाणे - भिवंडी महानगरपालिका (Bhiwandi Corporation) क्षेत्रातील चव्हाण कॉलनी येथील एका सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टीक टँकमध्ये जोरदार स्फोट (septic tank explosion) झाल्याची घटना घडली आहे. यात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. इब्राहिम शेख (वय ७० ) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

घटनास्थळावरचा आढावा

शौचास बसलेले असतानाच घडली दुर्घटना -

भिवंडी महानगरपालिकेकडून चव्हाण कॉलनी भागात सुमारे १५ वर्षांपूर्वी सार्वजनिक शौचालय उभारले होते. हे सार्वजनिक शौचालय एका खासगी ठेकेदाराला चालवण्यासाठी महापालिकेने दिले होते. शौचालयात काही नागरिक शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास शौचास गेले. त्यावेळी तेथील शौचकूपा खालील टँकमध्ये स्फोट झाला. त्यावेळी शौचास बसलेले दोघेजण टाकीत पडले. त्यामध्ये ७० वर्षीय इब्राहिम शेख यांचा मृत्यू झाला असून दोन जखमी व्यक्तींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेकडो शौचालयांच्या देखरेख व दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित -

या दुर्घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पालिका आपत्कालीन कक्षास दिली. त्यानंतर भिवंडी महापालिका आपत्कालीन विभाग व अग्निशमन दलाचे जवान व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. विशेष म्हणजे यापूर्वीही अशीच दुर्घटना घडून एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भिवंडी शहरातील शेकडो सार्वजनिक शौचालयांच्या देखरेख व दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Last Updated : Feb 25, 2022, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.