ETV Bharat / state

Thane Beauty Parlor Owner Murder : उसनवारीच्या वादातून माय-लेकाने केली महिलेची हत्या, एकाला अटक

उसनवारीने दिलेले १ लाख रुपये मागण्यासाठी ब्युटीपार्लरची ( Beauty Parlor Owner Murder ) मालकीण घरी गेली असता वाद होऊन माय-लेकानी मिळून तिच्यावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका ( Chakkinaka Area Murder ) परिसरात असलेल्या शास्त्रीनगरमधील चाळीत घडली आहे.

Thane Beauty Parlor Owner Murder
Thane Beauty Parlor Owner Murder
author img

By

Published : Apr 10, 2022, 3:59 PM IST

Updated : Apr 10, 2022, 5:17 PM IST

ठाणे - उसनवारीने दिलेले १ लाख रुपये मागण्यासाठी ब्युटीपार्लरची ( Beauty Parlor Owner Murder ) मालकीण घरी गेली असता वाद होऊन माय-लेकानी मिळून तिच्यावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका ( Chakkinaka Area Murder ) परिसरात असलेल्या शास्त्रीनगरमधील चाळीत घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात माय-लेकावर हत्येचा गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. विजय अनंतलाल राजभर, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लालसादेवी राजभर ही फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहे. तर रंजना राजेश जैसवार (३९) असे निर्घृण हत्या झालेल्या ब्युटीपार्लरच्या मालकीनीचे नाव आहे.

प्रतिक्रिया

पैसे देण्यास टाळाटाळ - मृतक रंजना हीचे आरोपीचा भाऊ अजय राजभर याच्या सोबत मैत्रिचे संबंध होते. तसेच मृतक रंजना हीने अजयला १ लाख रुपये उसनवार दिलेले होते. त्यामुळे मृत रंजना ही अजयकडे उसनवार दिलेले पैसे मागिण्याकरिता तगादा लावत होती. मात्र, अजय हा पैसे देण्यास टाळाटाळ करत होता, त्यामुळे मृतक रंजना ही अजयच्या घरी शुक्रवारी रात्री १० वाजल्याच्या सुमारास जावून उसनवार दिलेल्या पैश्यांची मागणी करत असतना वाद झाला होता. त्यानंतर आरोपी विजय आणि त्याची आई लालसादेवी यांनी आपसात संगनमत करून रंजना जैसवार हिच्या पोटावर, पाठीवर, छातीवर गळयावर तसेच डावेबाजूचे काखेत चाकुने वार करून तिची निर्घृण हत्या केली.

आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात हजर - याप्रकरणी मृतक रंजनाचा पती राजेश जैसवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०२, २४ प्रमाणे माय लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विजय स्वतःच आज सकाळी ७ वाजल्याच्या सुमारास कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हजर होवून त्याने रंजनाची चाकुने वार करून हत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला.

हेही वाचा - Inquiry Committee : शरद पवारांच्या घरासमोरील आंदोलन प्रकरणी विश्वास नागरे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती

Last Updated : Apr 10, 2022, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.