ETV Bharat / state

Thane Crime News: स्वातंत्र्यदिनी स्टेटस ठेवणे तरुणाला पडले महागात; पोलिसांनी आरोपी तरुणाला केली अटक - Offensive posts on Social Media

एकीकडे मोठ्या जल्लोषात भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. तर, दुसरीकडे दोन गटात तेढ निर्माण करणारे स्टेटस मोबाईलवर ठेवत विचित्र कृती करताना समाज कंटक दिसत आहेत. ठाणे येथे स्वातंत्र्य दिनी धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटस मोबाईलवर ठेवल्याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

Thane Crime News
तरुणाला उल्हानसागरमधून अटक
author img

By

Published : Aug 16, 2023, 8:08 PM IST

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड

ठाणे : देशाच्या विरोधात भाष्य करून दोन गटात तेढ निर्माण करणारे स्टेटस मोबाईलवर ठेवून, स्वातंत्र्यदिनी धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. इकरार खान असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने व्हाट्सएपवर देशात तेढ निर्माण करणारे स्टेटस ठेवले होते, असा आरोप आहे.

मोबाईलवर वादग्रस्त पोस्ट : मंगळवारी देशभरात स्वतंत्रदिन उत्साहात साजरा होत असतानाच, उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाणे परिसरात राहणाऱ्या आरोपी इकरार खान याने त्याच्या मोबाईलवर भारता विषयी वादग्रस्त पोस्ट करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. ही धक्कादायक बाब उल्हासनगर शहरातील मनसेच्या कार्यकर्त्यानी बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सोशल मीडियावार व्हायरल झालेल्या पोस्ट विषयी माहिती दिली.

सापळा रचून आरोपी ताब्यात : पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या व्हिडिओसंबंधी माहिती घेतली. स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाचा रात्रीच्या सुमारास शोध घेऊन त्याला उल्हासनगर शहरातून सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

न्यायालयात केले हजर : आज अटक आरोपीला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच त्याने हा स्टेटस ठेवण्यामागे काय उद्देश होता, त्यामागे आणखी कोणी आहे का? याचा पोलीस तपास करत असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे स्वातंत्र्यदिनाला गालबोट लागले. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केल्याने शहरात शांततेचे वातावरण दिसून आले.

हेही वाचा -

  1. Solapur Crime News: आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तीन युवकांना बेदम मारहाण; व्हिडीओ चित्रीकरण करून केला सोशल मीडियावर अपलोड
  2. Mumbai Crime News: पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचे स्टेटस ठेवणाऱ्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक
  3. Valgaon States Dispute: सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स; वलगावात नऊ जण गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.