ETV Bharat / state

Generic Drugs For Animals: आता मुक्या प्राण्यांनाही मिळणार जनेरिक औषधे, उपचाराअभावी होणारे मृत्यू थांबणार

author img

By

Published : Apr 4, 2023, 6:17 PM IST

Updated : Apr 4, 2023, 6:26 PM IST

भारत या कृषिप्रधान देशांमध्ये जनावरांवर होणारे आजार याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे काही महिन्यापूर्वीच आजाराने देशभरात हजारो पाळीव जनावरांचा मृत्यू झाला अशा प्रकारचे आजार हे वारंवार येत असतात. त्यामुळे शेती युक्त जनावर असो किंवा पाळीव प्राणी असो त्यांना आपल्या जीवाला मुकावे लागते. योग्य उपचार मिळत नसल्यामुळे आणि त्यासाठी शेतकऱ्यांकडे उपचाराला पैसे नसल्यामुळे हा जनावरांचा जीव जात असतो. याबद्दलच अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडल्यानंतर ठाण्यातले युवा उद्योजक आणि जनेरिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका युवकाने औषध उपलब्ध केले केले आहे.

Generic Drugs For Animals
Generic Drugs For Animals
पशुवरील वैद्यकीय औषधांबद्दल ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी मनोज देवकर आढावा घेताना

ठाणे : भारत बाहेरील देशांना पशुवरील वैद्यकीय औषधे पुरविणारा हब आहे. मात्र, कृषीप्रधान देश असणाऱ्या भारतातील शेतकरी हे त्यांच्या गाई म्हशी बैल सारख्या अन्य पशुधनांवर अवलंबून असतात. त्यांचे आरोग्य चांगले असेल तर शेतकरीसुद्धा मानसिक दृष्ट्या सक्षम राहतो. ही गोष्टच आजपर्यंत कोणाच्या लक्षात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना पशुवरील वैद्यकीय औषधांसाठी जास्तीचे पैसे मोजून, गावाबाहेर न जाता स्थानिक पातळीवर जेनरिक आधार दुकानांच्या माध्यमातून संपूर्ण देशात उपलब्ध होणार आहे. तसा करार शासनाने आंध्रप्रदेश सरकारबरोबर केला असल्याची माहिती ठाण्यातील जनेरिक औषध देणारे अर्जुन देशपांडे यांनी दिली आहे.

लाखो मुक्या प्राण्यांचा जीव वाचू शकतो : सर्वसामान्य रूग्णांची जनेरिक आधाराच्या माध्यमातून जवळपास तीन हजार कोटी बचत झाली होती. या ठाणेकर युवकाने प्राण्यांसाठी महाग म्हणून ओळखली जाणारी औषधे ८० टक्के कमी दरात आता जनेरिक औषध दुकानांमध्ये मिळणार आहेत. सध्या देशात ७० ठिकाणी ही दुकाने सुरू असून, भविष्यात २०० दुकाने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दक्षिणेकडील अनेक राज्य सरकार प्रशासनाने या प्राण्यांच्या जेनरिक औषधांबद्दल आपुलकी दाखवत शेतकऱ्यांसाठी ही औषध आता राज्य सरकार म्हणून, विकत घेण्याची तयारी देखील सुरू केलेली आहे. सरकारकडून प्राण्यांसाठी होणारे हे प्रयत्न देश स्तरावर झाल्यानंतर लाखो मुक्या प्राण्यांचा जीव वाचू शकतो असा आत्मविश्वास अर्जुन देशपांडे यांनी व्यक्त केला.

माणसांची औषधं बनवणं सोपं मात्र प्राण्यांची कठीण : माणसांची औषधं बनवताना औषध कंपन्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, प्राण्यांचे औषध बनवताना औषध कंपन्यांना त्यापेक्षा अधिक परिश्रम घ्यावे लागतात. कारण, वेगवेगळ्या प्राण्यांवरती वेगवेगळ्या औषधांचा उपचार केला जातो. त्यामुळे ही औषध वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या जातीची असल्यामुळे ही खर्चिक बाब असते. म्हणूनच जनरिकच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना परवडतील, अशा किमतीमध्ये औषध उपलब्ध करून देणे हे ध्येय ठेवत या संकल्पनेला देशपांडे यांनी अस्तित्वात आणले आहे.

रतन टाटांनी केली मदत : जनरिक क्षेत्रामध्ये काम करणारा अर्जुन देशपांडे यांची संकल्पना ऐकल्यानंतर टाटा समूहाच्या रतन टाटा यांनी जनरिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अर्जुन देशपांडे यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक देखील केली एवढेच नाही तर अर्जुन देशपांडे यांना आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी टाटा यांच्याकडून पाठबळ दिले जाते. अर्जुन देशपांडे यांनी टाटांच्या या समाज कामाबद्दल आभार व्यक्त करत समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा : Palghar Crime : पालघर साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली; पोलीस मित्राच्या सतर्कतेमुळे दोन्ही साधू सुखरूप

Last Updated : Apr 4, 2023, 6:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.