ETV Bharat / state

आधारवाडी कारागृहात नव्या कैद्यांना बंदी; डॉन बास्को शाळेत होणार रवानगी

author img

By

Published : May 31, 2020, 10:07 AM IST

नव्याने येणाऱ्या कैद्यांमुळे आधारवाडी कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. त्यामुळे या कैद्यांच्या सुरक्षेसाठी नव्या कैद्यांची व्यवस्था शाळेत करण्यात आली आहे.

adharwadi jail
आधारवाडी कारागृह

ठाणे- बाहेरून येणाऱ्या कैद्यांमुळे कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नवीन कैद्यांची व्यवस्था कारागृहाच्या बाहेरच करण्याचा निर्णय आधारवाडी कारागृह प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाच्या आधारे कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून नवीन कैद्यांसाठी शेजारील डॉन बॉस्को शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय कारागृह प्रशासनाने पहिल्या लॉकडाऊनच्या दरम्यान जेलमधील कैद्यांना येण्या-जाण्यावर निर्बंध घातले आहेत.

कल्याणच्या या कारागृहात 540 कैद्यांना सामावून घेण्याची क्षमता असताना त्यात तिप्पट म्हणजेच जवळपास दीड हजार कैद्यांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना दाटीवाटीने राहावे लागत आहे. या कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमता पूर्ण झाल्याने नव्याने येणाऱ्या कैद्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात पाठवले जात आहे. त्याचबरोबर कारागृहाची दुरुस्ती व विस्तारीकरणाचा प्रस्तावही लालफितीत अडकल्याने कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोरोनाची दहशत चार भिंतीत शिक्षा भोगणाऱ्या कच्च्या-पक्क्या कैद्यांमध्येही पसरली आहे. प्रशासनाने नव्या कैद्यांना त्याच परिसरातील डॉन बॉस्को शाळेत व्यवस्था केली आहे. या शाळेच्या भोवती कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दाटीवाटीने भरलेल्या आधारवाडी कारागृहातील काही कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली असली तरी अद्यापही हजारो कैदी आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित राहण्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे. कारागृहामधील कैद्यांची संख्या कमी केल्याशिवाय सुरक्षित राहणे, नियम पाळणे शक्य नसल्यामुळे काही कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. तरीही कारागृहातील कैद्याची संख्या फारशी कमी झालेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.