ETV Bharat / state

कल्याण डोंबिवलीत २४ तासात ४१३ कोरोना रुग्णांची भर; कोविड हेल्थ सेंटरची सुविधा मंगळवारपासून - कल्याण डोंबिवली कोरोना आकडेवारी

कल्याण डोंबिवलीत २४ तासात ४१३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे, महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णसंख्या ९ हजार ४९९ वर पोहोचली आहे. तर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरची सुविधा डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल येथे उद्यापासून कार्यान्वित होणार आहे.

कल्याण डोंबिवलीत २४ तासात ४१३ कोरोना रुग्णांची भर

author img

By

Published : Jul 6, 2020, 9:06 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा कहर सुरू असून गेल्या २४ तासात नव्याने ४१३ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे, महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णसंख्या ९ हजार ४९९ वर पोहोचली आहे. तर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरची सुविधा डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल येथे उद्यापासून कार्यान्वित होणार आहे.

आजही कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यासह उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वाढल्याचे दिसून आले. यात आतापर्यंत १४४ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, तब्बल ५ हजार ३२३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी आढळून आलेल्या रुग्णांची विगतवारी पाहता सर्वाधिक १६० रुग्ण हे डोंबिवली पूर्व परिसरात, कल्याण पूर्वेत ६९ आणि कल्याण पश्चिममध्ये ११९ तर, डोंबिवली पश्चिमेत ३८ आणि टिटवाळा - मांडा परिसरात ५ व मोहने गावात १२ तर, पिसवली गावात १० असे एकूण एकाच दिवशी ४१३ रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरची सुविधा उद्यापासून सुरू

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेञातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना अधिक चांगले उपचार देण्याच्या दृष्टीकोनातून डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल येथे ३० खाटांचे आयसीयू असलेले व १५५ ऑक्सीजन खाटांचे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर उद्यापासून कार्यान्वित होणार आहे. तर सावळाराम क्रीडा संकुलाप्रमाणेच डोंबिवली जीमखाना, टेनिस कोर्ट, पाटीदार हॉल तसेच कल्याणमधील आर्ट गॅलरी व आसरा स्कुल येथे सुमारे १ हजार खाटांची सुविधा महापालिका, कोविड रुग्णांसाठी करत आहे. शास्त्रीनगर रुग्णालयावरती प्रचंड ताण असून सावळाराम क्रीडा संकुलातील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यान्वित होत असल्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. टेस्टिंग वाढल्यामुळे कोरोना रुग्णांची माहिती मिळण्याचे प्रमाणही वाढले आहे. परंतू लोकांनी त्यासाठी घाबरून जावू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वै.ह.भ. प. सावळाराम क्रीडा संकुलातील कै. सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात सुमारे १४ हजार स्वे. फूट जागेत सर्वसुविधा युक्त १५५ ऑस्किजनची सोय असलेल्या खाटा असलेले व ३० खाटा असलेले आयसीयुचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उद्यापासून सुरू होत आहे. यामध्ये १० व्हेटिंलेटर्सची व १५ बायपॅपची देखील सोय करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी कंफर्ट कुलींगची सुविधा असून रुग्णांचा ताण हलका व्हावा यासाठी संगीत सुरावटीची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.