ETV Bharat / state

अमली पदार्थ बाजारात पेपरबॉम्बला मोठी मागणी; मुंबई, ठाण्यात विक्रीचा प्रयत्न - New drugs Thane

नवीन अमली पदार्थांची तस्करी केली तर ते सामान्य माणूस काय खुद पोलिसांच्या देखील नजरेत येत नसल्याने ड्रग्ज तस्कर अनेक छुप्या अमली पदार्थांची तस्करी व विक्री भारतात करू लागले आहेत. या नवनवीन ड्रग्जच्या प्रकारात आता एलएसडी पेपर उर्फ पेपरबॉम्ब या अमली पदार्थाची भर पडली आहे.

Paperbomb Thane
अमली पदार्थ ठाणे
author img

By

Published : Jan 27, 2021, 6:47 PM IST

ठाणे - कोकेन, चरस, अफिम, गांजा, एमडी व इतर प्रचलित ड्रग्ज विक्री व सेवनावर भारतात कडक निर्बंध असल्याने ड्रग्ज माफिया आता अनेक पर्यायी अमली पदार्थांची निर्मिती करू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिसांना देखील माहीत नसलेले एमडी आणि एफेड्रिन हे अमली पदार्थ देखील त्यापैकीच एक आहेत. नवीन अमली पदार्थांची तस्करी केली तर ते सामान्य माणूस काय खुद पोलिसांच्या देखील नजरेत येत नसल्याने ड्रग्ज तस्कर अनेक छुप्या अमली पदार्थांची तस्करी व विक्री भारतात करू लागले आहेत. या नवनवीन ड्रग्जच्या प्रकारात आता एलएसडी पेपर उर्फ पेपरबॉम्ब या अमली पदार्थाची भर पडली आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मानसोपचार तज्ज्ञ

काय आहे पेपर बॉम्ब

गंधहीन आणि कार्टूनच्या स्टिकरवर असलेले हे ड्रग्ज सहजासहजी ओळखणे अत्यंत अवघड असते. त्यामुळे, या पेपरची चव घेतल्याशिवाय ते ओळखणे जवळपास अशक्य आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आणि शाळा, कॉलेज परिसरात विक्री करण्यासाठी खास हा ड्रग्ज डिझाइन करण्यात आला आहे. विशिष्ट प्रकारच्या पारदर्शक पेपरला कोलाईक अ‌ॅसिडमध्ये भिजवून नंतर त्यास डाईएथाईलामाईड नावाच्या केमिकलमध्ये कम्पोनेंट करून ट्रान्सपरंट फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट केले जाते. या प्रक्रियेनंतर ही पेपरशीट ड्राय करून त्यावर कार्टूनचे स्टिकर लावले जाते. त्यानंतर या पेपरवर पिंक - सूपर मॅन, ब्ल्यू - बॅटमॅन, ब्लॅक - स्पाईडरमॅन अशी विविध कार्टून्सची चित्रे लावली जातात. सध्या किरकोळ ड्रग्ज विक्री मार्केटमध्ये आय - 25, प्रमोदम, टपरी अशा विविध कोडवर्डने हे ड्रग्ज संबोधले जातात.

हेही वाचा - ठाणे : रस्त्यावर धावल्या ४० व्हिंटेज कार, ३० सुपर कार आणि दुचाकींची विलक्षण परेड

एका एलएसडी पेपरची किंमत 165 डॉलर म्हणजेच, सुमारे 12 हजार रुपयापर्यंत असते. विदेशात या ड्रग्ज प्रकाराने अत्यंत कहर केलेला असून अनेक देशातील युवा पिढी या ड्रग्जच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेली आहे. त्यामुळे, आता भारताच्या दारात येऊन ठेपलेले हे किचकट ड्रग्ज आगामी काळात मोठी डोकेदुखी ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एलएसडी पेपर हा जास्त करून युरोप व आफ्रिका खंडात उत्पादन केला जातो. भारतात आतापर्यंत तरी याचे कुठेही उत्पादन झाल्याची घटना समोर आलेली नाही. त्यामुळे, ठाणे पोलिसांनी पकडलेला एलएसडी पेपर विदेशातून भारतात आला, की त्याचे भारतातच उत्पादन करण्यात आले, याचा शोध पोलीस घेत आहे. हे ड्रग्ज खासकरून शाळा, कॉलेजेस आणि आयटी पार्क असलेल्या परिसरात विक्री करण्यात येत होते, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. तर, बॉलिवूडमध्ये देखील या ड्रग्जची मोठी क्रेज आहे. ओळखण्यास अत्यंत कठीण व कुठेही सहज लपवता येण्यासारखे असल्याकारणाने पारंपरिक ड्रग्ज ऐवजी अनेक सेलेब्रिटीज या पेपरला पसंती देतात, अशी माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याने दिली.

मोठा ग्राहक वर्ग युवा पिढी

ड्रग्ज माफियांचा सर्वात मोठा ग्राहक म्हणजे युवा वर्ग आहे. त्यामुळे, युवा वर्गापर्यंत ड्रग्ज पोहचवण्यासाठी इंटरनॅशनल लेव्हलवर माफिया गँग अनेक नवनवे मार्ग शोधत असतात. अलीकडच्या काळात अनेक ड्रग्ज माफियांनी आपल्या गँगला कंपनीचे स्वरूप दिले आहे. या ड्रग्ज माफिया कंपनीत नियुक्त केलेली क्रिएटिव्ह टीम युवा वर्गापर्यंत ड्रग्ज पोहचवण्यासाठी अनेक नवनवे डिझाइन विकसित करतात. याच ड्रग्ज माफियांच्या क्रिएटिव्ह टीमने एलएसडी हे पेपर डिझाइन केलेले आहे. पेपरवर ड्रग्ज लावून त्यावर कार्टूनचे चित्र लावून ते विक्रीसाठी पाठवण्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे हे ड्रग्ज शाळा व कॉलेज परिसरात सहज विक्री करता येणे. त्यामुळे, यावर पोलिसांची करडी नजर आहे.

पोलीस वारंवार अशा लोकांवर कारवाई करत आहे. स्पेशल टीम यावर नजर ठेवून आहे. तसेच, याबाबत आम्ही जनजागृतीही करत आहोत, असे पोलीस अधिकारी सांगत आहेत. तर, आपला मुलगा काय करतो याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांनी पालकांना केले आहे. तरुणांना वाटते त्यात मज्जा आहे, त्यात काहीतरी वेगळेपण आहे, त्यामुळे तरुण अमली पदार्थांकडे ओढले जातात. तर, पालक व मुलांमध्ये संवाद तुटल्याने त्यांच्यात एक दरी निर्मण झाली आहे. हे सध्याच्या घडीला मुख्य कारण आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मुले अमली पदार्थांकडे वळत आहेत. त्यामुळे, पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. त्यांच्याशी बोलत राहिले पाहिजे, तसेच सामाजिक जनजागृतीही करणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ व डॉक्टर सांगतात.

आभासी विश्व संभ्रम होतो निर्माण

पेपरबॉम्ब अर्थात एलएसडी पेपर हे ड्रग्ज मार्केटमध्ये सर्वात आधुनिक आणि महाग म्हणून त्याची ओळख आहे. पिंक सूपर मॅन, ब्ल्यू - बॅटमॅन, ब्लॅक - स्पाईडरमॅन, आय - 25 अशा विविध कोडवर्डने ड्रग्ज मार्केटमध्ये एलएसडी पेपर ओळखला जातो. हे ड्रग्स पावडर, टॅबलेट आणि लिक्विड अशा तिन्ही प्रकारात उपलब्ध आहे. मात्र, तरुणाईकडून या ड्रग्ज च्या पेपर प्रकाराला जास्त मागणी असते. या पेपरचा तुकडा जिभेवर ठेवताच तो हळूहळू विरघळू लागतो व नशा होते. त्यामुळे, सूपर हिरो असल्याचा भास होऊन नशा करणाऱ्या व्यक्तीला आकाशात उंच भरारी घेऊ शकतो, अथवा समुद्रात कितीही किलोमीटर अंतर पोहून पार करू शकतो, असा आभास होतो.

पेपर बॉम्ब या ड्रग्जने ब्राझील, ऑस्ट्रेलिया, युरोप या देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. विदेशात या ड्रग्जवर कडक निर्बंध आहेत. या ड्रग्जला भारतात विशेष करून मुंबई - ठाण्यात रुजवण्यासाठी ड्रग्ज माफिया मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत असल्याचे सूत्र सांगतात. अलीकडे मुंबई व ठाण्यात अनेक ठिकाणी एलएसडी पेपर पोलीस कारवाईत पकडण्यात आले आहेत. त्यावरून हा ड्रग्ज प्रकार भारतात रुजवण्यासाठी ड्रग्ज माफिया प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा - सराफ दुकानावरील दरोड्याच्या गुन्ह्यातील तिघांना अटक, दोघे फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.