ठाणे - येथे दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून नव्याने आणखी ११ जणांना लागण झाल्याने बाधितांच्या संख्येत भर पडली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत कोरोनाबधितांची संख्या 168 वर पोहचली असून यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 168 कोरोनाबधितांवर खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोव्हिड -19 च्या लोकांना उपचारासाठी ठाण्यातील कळवा छत्रपती रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय हे ठेवण्यात आले असून होरॉयझन या ठिकाणी देखील कोविड 19 बधितांवर उपचार सुरू आहेत. कोणत्या प्रभाग समितीमध्ये किती जण बाधित आहे याची आकडेवारी खालीलप्रमाणे -
1. सर्वात जास्त मुंब्रा प्रभाग समिती - 37
2. सर्वात कमी दिवा प्रभाग समिती - 3
3. माजीवड प्रभाग समिती - 20
4. वर्तक प्रभाग समिती - 19
5. लोकमान्य नगर प्रभाग समिती - 19
6. नौपाडा कोपरी प्रभाग समिती - 10
7. उथळसर प्रभाग समिती - 25
8. वागळे प्रभाग समिती - 12
9. कळवा प्रभाग समिती - 23