ETV Bharat / state

Crime News: सहकाऱ्याची हत्या करून फरार असलेल्या आरोपीला 30 वर्षांनंतर अटक; नवी मुंबई पोलिसांची कारवाई

Crime News: खूनाच्या घटना रोज कुठे न कुठे घडतात. काही वेळेस आरोपी पकडले जातात, तर काही वेळेस ते फरार होतात. असे असले तरी पोलीस दल याबाबतीत सतर्क असल्याचं दिसून येतंय. कारण नवी मुंबई पोलिसांनी एका खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला 30 वर्षांनंतर अटक केलीय. नक्की हे प्रकरण काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊ या. (Navi Mumbai police)

Thane Crime News
आरोपीला अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 8:35 PM IST

पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

नवी मुंबई Crime News:आपल्या एका सहकाऱ्याची हत्या करून गेली 30 वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला पंजाबमधून पनवेल पोलिसांनी अटक केलीय. तो गेल्या 30 वर्षांपासून मूळ गावापासून दूर नाव बदलून बिट्टुसिंग अर्जुनसिंग उर्फ बलविंदर सिंग राहत होता. त्याला नवी मुंबई परिमंडळ 2 च्या पनवेल पोलिसांनी अमृतसर येथील रैया गावातून ताब्यात घेतलंय.

काय आहे प्रकरण : मृत काशीमसिंग अजितसिंग विर्क (38), सलविंदर सिंग अमरसिंह मजवी (32), बीट्टूसिंग अर्जुनसिंग मजवी (33)व बाऊसिंग अर्जुन सिंग गौडस (40) हे मुंबई पनवेल येथे 1994 साली एकाच ठिकाणी काम करत होते. अचानक मालकानं सलविंदर सिंग अमरसिंह मजवी, बीट्टूसिंग अर्जुनसिंग मजवी, बाऊसिंग अर्जुन सिंग गौडस या तिघांना कामावरून काढून टाकलं होतं. काशीमसिंग या आपल्या सहकाऱ्यानं मालकाला चहाडी केल्यामुळं त्यानं कामावरून काढल्याचा संशय या तिघांना होता. त्याच रागातून या तिघांनी काशीमसिंग हा पनवेल येथून टॅन्कर घेऊन जात असताना त्याची हत्या केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी सलविंदर सिंग मजवी याला अटक करण्यात आलं होतं. पण, त्याचे उर्वरित सहकारी फरार झाले.

30 वर्षांनी फरार आरोपीला अटक : आपल्या सहकाऱ्यांला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर बीट्टूसिंग अर्जुनसिंग मजवी, व बाऊसिंग अर्जुनसिंग गौडस हे दोघे फरार झाले. नाव बदलून मूळ गावापासून दूर राहत होते. यापैकी या खून प्रकरणातील आरोपी बाऊसिंग अर्जुन सिंग गौडस याचा मृत्यू झालाय. तर गेल्या तीस वर्षापासून फरार आरोपी बीट्टूसिंग अर्जुनसिंग मजवी हा बलविंदर सिंग दर्शन सिंग, असं नाव बदलून पंजाब येथील अमृतसर येथील रैना गावात गेल्या 30 वर्षांपासून राहत होता. अखेर नवी मुंबई परिमंडळ2 च्या पनवेल पोलिसांनी गुप्त बातमीदार पंजाब पोलिसांच्या सहकार्यानं बिट्टूसिंग उर्फ बलविंदर सिंग याला ताब्यात घेऊन अटक केलंय.

  • आरोपींना केलं गजाआड : नवी मुंबई परिमंडळ दोनच्या पोलिसांनी आणखी दोन गुन्ह्यांची उकल केलीय. 2016 मधील खून प्रकरणात फरार असलेल्या आणखी दोन आरोपींना देखील पोलिसांनी गजाआड केलं आहे. गेल्या दोन महिन्यांत जुन्या तीन गुन्ह्यांची उकल पोलिसांच्या माध्यमातून झालीय.

    हेही वाचा :
  1. Thane Murder News : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या प्रकरण; प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक
  2. Little Girl Rape Case : चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, नराधमाला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी वापरली 'ही' युक्ती
  3. Journalist J Deys killer arrested : पत्रकार 'जे डे'चा मारेकऱ्याला भारत-नेपाळ सीमेवरून अटक; पॅरोलवर सुटल्यावर होता फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.